Join us
Daily Top 2Weekly Top 5

शंतनु देशपांडे यांची पहीलीच निर्मिती असलेला वज्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2017 16:44 IST

वज्र हा चित्रपट नुकताच प्रदशित झाला. या चित्रपटातील मुजरा असो या गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. विशेष ...

वज्र हा चित्रपट नुकताच प्रदशित झाला. या चित्रपटातील मुजरा असो या गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शंतनु देशपांडे निर्मित निर्मित हा पहिलांच चित्रपट आहे. यापूर्वी  या चित्रपटाविषयी शंतनु देशपांडे सांगतात, . हा चित्रपट माझ्यासाठी एक प्रयोग होता, यात  या सिनेमा चे गीतकार, संगितकार आणि कार्यकारी निर्माते चंद्रमोहन हंगेकर यांची मला मोलाची साथ मिळाली आहे. संगीतकार चंद्रमोहन यांनी १९९५ पासून अनेक चित्रपटांच्या संगीत निर्मिती, दिग्दर्शनात काम केले. प्रत्येक वेळी नवीन गायक किंवा वादक यांना संधी देण्यात ते यशस्वी झाले. आशुतोष जोशी, चंद्रशेखर महामुनी, राहुल सक्सेना, पोर्णिमा दिक्षित, अमोल घाटे, आशिष कुलकर्णी, चंदन कांबळे अशा अनेक गायकांना चित्रपटात संधी मिळाली. त्यांनी शाहीर साबळे, सुलोचना चव्हाण, उषा मंगेशकर, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, मधुश्री, उदित नारायण, कृष्ण बेवरा, सुदेश भोसले, बेला शेंडे, स्वप्नील बांदोडकर, साधना सरगम अशा गायकांना संगीत दिग्दर्शन केले. तसेच  मुरळी, आई शक्तीदेवता, सत्यमेव जयते, शंभू माझा नवसाचा, पाठराखीण, पाच शक्तिमान, शाकम्भरीचा महिमा, तात्या विंचू लागे रहो, ओटी कृष्णामाईची हे त्यांचे चित्रपट संगीतासाठी गाजले. आता असे हे प्रेक्षकांचे लाडके संगीतकार चंद्रमोहन यांनी वज्र या चित्रपटातील मुजरा लिहीला आहे, त्यांचा हा मुजरा  हिंदी आणि उर्दू मिश्रित लिहिल्याने भारताबाहेर पाकिस्तान, सौदी, दुबई, ऑस्ट्रेलिया या देशातील लोकांनाही हे मुजरा गीत आवडले. त्यातील मानसी नाईक यांच्या अदाकारीने तर त्यावर कहर केला.