Join us
Daily Top 2Weekly Top 5

​'भेटली तू पुन्हा'च्या टीममधील वैभव तत्त्ववादी आणि पूजा सावंत यांनी लोकमत ऑफिसला दिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2017 14:31 IST

'भेटली तू पुन्हा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यानिमित्ताने सिनेमातील कलाकारांनी नुकतीच लोकमतच्या ऑफिसला भेट दिली. या चित्रपटात नेमके ...

'भेटली तू पुन्हा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यानिमित्ताने सिनेमातील कलाकारांनी नुकतीच लोकमतच्या ऑफिसला भेट दिली. या चित्रपटात नेमके काय पाहायला मिळेल याचा खुलासा वैभव तत्त्ववादी आणि पूजा सावंत यांनी केला. वैभव या चित्रपटात आलोक भावे या तरुण मुलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. अतिशय स्वच्छंदी स्वभावाच्या या मुलाच्या आयुष्यात जेव्हा अश्विनी सारंग येते तेव्हा काय घडतं? त्यांचा हा प्रवास त्यांच्या आयुष्यात कोणते नवे वळण घेऊन येतो? या साऱ्या प्रश्नांचा उलगडा या चित्रपटातून होणार आहे. पूजा सावंत या चित्रपटात अश्विनी सारंगची भूमिका साकारणार आहे. अतिशय मनमोकळ्या स्वभावाची पूजा या चित्रपटात खूप धमाल मस्ती करताना दिसणार आहे. कलाकारांमधील केमिस्ट्रीबद्दल बोलताना पूजा सांगते, "उत्तम केमिस्ट्री असणे फार आवश्यक आहे. त्यामुळे विचारांची देवाणघेवाण चांगली होते. टीझरमध्येच ही केमिस्ट्री दिसल्याने दहा लाखांहूनही जास्त लोकांनी सोशल प्लॅटफॉर्मवर हा टीझर लाईक केला आहे. या सिनेमातील 'जानू जानू' या गाण्याला प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने पसंती दिली आहे." तर वैभव सांगतो, "जर चांगली केमिस्ट्री नसेल तर काहीतरी चुकल्यासारखे वाटते आणि ते ऑनस्क्रीनही दिसून येते." 'भेटली तू पुन्हा' या चित्रपटाचे लेखन संजय जमखंडी यांनी केले आहे. या चित्रपटाच्या नावाविषयी ते सांगतात की, "या चित्रपटाचे टायटल साँग 'भेटली तू पुन्हा' हे आहे आणि त्यावरूनच सिनेमाचे नावही तेच ठेवायचे असे ठरले. सिनेमाचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे लोकमतशी बोलताना सांगतात की, "चित्रपटाची कथा जर उत्कृष्ट असेल तर मार्केटिंगला अडचण येत नाही. जर आपण केलेली कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची असेल तर मार्केटिंगला पर्याय नाही. उत्तम कथेप्रमाणेच योग्य मार्केटिंग ही चित्रपटाची गरज आहे." या सिनेमाचे निर्माते गणेश हजारे सांगतात, "प्रेक्षकांना जे चांगले असतं ते आवडतेच. त्यामुळे या सिनेमाला निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल यात शंका नाही." हा सिनेमा २१ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. Also Read : वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘भेटली तू पुन्हा’ चा ट्रेलर प्रदर्शित!