Join us

वैभव तत्त्ववादी आणि पूजा सावंत‘लव्ह एक्स्प्रेस’सिनेमाच्या नावात झाला बदल,‘भेटली ती पुन्हा’ असे झाले नामकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2017 16:01 IST

काही महिन्यांपूर्वी अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि अभिनेत्री पूजा सावंत यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या लव्ह एक्स्प्रेस या नव्या सिनेमाची घोषणा ...

काही महिन्यांपूर्वी अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि अभिनेत्री पूजा सावंत यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या लव्ह एक्स्प्रेस या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. मात्र ही लव्ह एक्स्प्रेस पुढे जाण्याऐवजी रुळावरुन खाली आली असून आता या सिनेमाला नवं शीर्षक मिळालं आहे. भेटली तू पुन्हा या नावाने हा सिनेमा आता रसिकांच्या भेटीला येणार आहे. रुपेरी पडद्यावर प्रेमकथा कायमच रसिकांच्या काळजाला भिडल्या आहेत.प्रेमकथाच सिनेमाच्या जान राहिल्या आहेत. त्यामुळेच प्रेमावर आधारित लव्ह एक्स्प्रेसची घोषणा करण्यात आली होती. आता मात्र भेटली तू पुन्हा या नावाने ही लव्ह स्टोरी रसिकांच्या भेटीला येणार आहे. शीर्षक बदललं असलं तरी या सिनेमातील कलाकार मात्र तेच असणार आहे. वैभव तत्त्ववादी आणि पूजा सावंत यांच्यातील रोमान्स रसिकांना रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. दोघांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका असून त्यांचा रोमान्स रुपेरी पडद्यावर रंगणार आहे. वैभव आणि पूजाची केमिस्ट्री याआधी रसिकांनी चीटर या सिनेमात पाहिली होती. आता भेटली तू पुन्हा या सिनेमात वैभव-पूजा यांचा रोमान्स रसिकांवर काय जादू करतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.‘दगडी चाळ’ फेम दिग्दर्शक चंद्रकांत कणसे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. तर सिनेमाचं लेखन संजय जमखंडी यांचं असून चिनार-महेश यांचं या सिनेमाला संगीत लाभलंय. त्यामुळे लव्ह एक्स्प्रेस ट्रॅकवरुन उतरली असली तरी ‘भेटली तू पुन्हा’ या प्रेमकथेचा अनोखा पैलू रसिकांच्या मनावर गारुड घालेल असा विश्वास सिनेमाच्या टीमकडून व्यक्त होतोय.