Join us

ही मराठी अभिनेत्री लवकरच बनणार आई,  हे एप्रिल फूल नाही म्हणत शेअर केली गुड न्यूज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 13:14 IST

Urmila Nimbalkar gives good news to fans,उर्मिला निंबाळकर  सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने नुकताच बेबी बंप असलेला फोटो शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.तिच्या या फोटोवर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

कुणी तरी येणार येणार गं…. या गाण्याच्या ओळी सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरातून ऐकायला मिळत आहेत. लवकरच तिच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे उर्मिला निंबाळकर  

उर्मिला निंबाळकर  सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने नुकताच बेबी बंप असलेला फोटो शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.तिच्या या फोटोवर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

पहिल्यांदाच ही आनंदाची बातमी तिने आज चात्यांसह शेअर केली आहे. हा फोटो बघून अनेकांना आज १  एप्रिल म्हणून उर्मिला फिरकी घेते की काय असेही वाटू शकते.  म्हणून तिने फोटोला कॅप्शन ही मजेशीर दिली आहे. हे एप्रिल फूल नाही असे म्हणत फोटो शेअर केला आहे. उर्मिलाने मॅटरनिटी फोटोशूट केले आहे. त्यातलेच काही निवडक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.यात ती बेबी बंप फ्लॉन्ट करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

उर्मिला निंबाळकर ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री असून विविध मालिकांमध्ये तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. दिया और बाती, मेरी आशिकी तुमसे ही या मालिकेत तिनं काम केलं आहे. उर्मिलाची छोट्या पडद्यावरील 'दुहेरी' ही मालिका चांगलीच गाजली होती.