Join us  

​प्रभो शिवाजी राजा या चित्रपटाच्या खास ध्वनीफितीचे अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 5:46 AM

अ‍ॅनिमेशन हे आजच्या पिढीतील बालकांपर्यंत पोहचणारे सर्वाधिक जिव्हाळ्याचे माध्यम आहे. त्यामुळे अॅनिमेशनच्या माध्यमातून भारतीय राष्ट्रपुरुषांची शिकवण नव्या पिढ्यांना कळावी ...

अ‍ॅनिमेशन हे आजच्या पिढीतील बालकांपर्यंत पोहचणारे सर्वाधिक जिव्हाळ्याचे माध्यम आहे. त्यामुळे अॅनिमेशनच्या माध्यमातून भारतीय राष्ट्रपुरुषांची शिकवण नव्या पिढ्यांना कळावी या दृष्टीने गणराज असोसिएट्स प्रस्तुत तसेच इन्फिनिटी व्हिज्युअल आणि मेफाक निर्मित प्रभो शिवाजी राजा हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. सर्वसामान्य मुलांसोबतच शिवरायांचा इतिहास दृष्टीहीन मुलांनाही कळावा यासाठी प्रभो शिवाजी राजा या चित्रपटाच्या खास ध्वनिफितीचे अनावरण यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये महाराष्ट्राचे उर्जामंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.     नुकत्याच पार पडलेल्या या ध्वनीफित प्रकाशन कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराजांवर आधारित या ध्वनीफितीचा कमला मेहता, नैब आणि हॅपी होम या शाळेतील दृष्टीहिन मुलांनी मनसोक्त आनंद लुटला. यशस्वीरित्या पार पडलेल्या या स्तुत्य उपक्रमाविषयी बोलताना सिनेमाचे दिग्दर्शक निलेश मुळे सांगतात, 'प्रभो शिवाजी राजा हा केवळ चित्रपट नसून एक चरित्रपट आहे. भारताच्या भावी पिढ्यांवर सुयोग्य संस्कार व्हावेत. तसेच त्यांना देशाचे सशक्त, समृद्ध आणि गौरवशाली भविष्य घडवण्यासाठी प्रेरित करता यावे असा या चित्रपट निर्मितीमागील उद्देश आहे. सर्वसामान्य मुलांसोबतच शिवरायांची गाथा  दृष्टीहीन मुलांपर्यंत देखील पोहचावी या उद्देशाने प्रभो शिवाजी राजा या चित्रपटाच्या ध्वनीफितीची निर्मिती करण्यात आली आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयंतीच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅनिमेशनपटाच्या माध्यमांतून शिवप्रेमींना येत्या १६ फेब्रुवारी रोजी राजांचे अनोखे रूप अनुभवता येणार आहे. प्रभो शिवाजी राजा हा चित्रपट टू डी अ‍ॅनिमेशनच्या माध्यमातून साकारण्यात आला असल्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीतील हा नवा आविष्कार ठरणार आहे. समीर मुळे यांची कथा, ख्यातनाम इतिहासकार निनाद बेडेकर यांचे संवाद आणि पटकथेचे साहाय्यक लेखन, शंकर महादेवन, स्वप्निल बांदोडकर, नंदेश उमप, उदेश उमप, श्रीरंग भावे यांची गाणी, डॉ.भरत बलवल्ली यांचे संगीत, नंदू घाणेकर यांचे पार्श्वसंगीत या सर्वांनी हा अ‍ॅनिमेशनपट समृद्ध झालेला आहे.मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार सचिन खेडेकर, उमेश कामत, उदय सबनीस, अविनाश नारकर, उज्ज्वला जोग, सुषमा सावरकर, विजू माने, कुषल भद्रिके इत्यादींचा आवाज या अ‍ॅनिमेशनपटाला लाभला आहे. Also Read : वास्तविक स्थळांचा संदर्भ घेऊन साकार झाला ‘प्रभो शिवाजी राजा’ सचेतनपट