Join us

वयाच्या 56 व्या वर्षीही अतिशय सुंदर दिसते 'ही' अभिनेत्री, लग्नानंतर परदेशात झाली सेटल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 15:24 IST

अनेक वर्षांपासून अमेरिकेत आपल्या कुटुंबियांसोबत राहत आहेत.

अर्चना जोगळेकर यांनी मराठी सोबतच हिंदी, ओडिशा यांसारख्या भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्यांना त्याकाळात चांगलेच फॅन फॉलोव्हिंग मिळाले होते. त्यांच्या सौंदर्याची तर चांगलीच चर्चा रंगली होती. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या होत्या. त्या एक खूप चांगल्या अभिनेत्री असण्यासोबतच खूपच चांगल्या डान्सर आहेत. त्या प्रसिद्ध कथ्थक डान्सर असून त्यांनी अनेक वर्षं नृत्याचे धडे गिरवले आहेत. अर्चना यांच्या नृत्य कौशल्याचे कौतुक नेहमीच केले जाते.

अर्चना यांची आई आशा जोगळेकर यांच्याकडून त्यांनी कथ्थकचे धडे गिरवले. अर्चना नृत्यालय असे त्यांच्या आईच्या डान्स स्कूलचे नाव असून आशा जोगळेकर यांनी १९६३ मध्ये या डान्स स्कूलची स्थापना केली होती. मराठीतील अनेक अभिनेत्रींनी या डान्स स्कूलमधून नृत्याचे धडे गिरवले आहेत. अर्चना यांनी या डान्स स्कूलची शाखा १९९९ मध्ये अमेरिकेत सुरू केली आणि आजही त्या तिथे डान्स स्कूल चालवत आहेत. आज अर्चना जोगळेकर आपला 56वा वाढदिवस साजरा करतायेत. 

 

अर्चना यांनी त्यांच्या कारकिर्दीत एका पेक्षा एक, निवडुंग, अनपेक्षित यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी संसार, आग से खेलेंगे, आतंक ही आतंक यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी मोठ्या पडद्याप्रमाणेच छोट्या पडद्यावर देखील काम केले. चुनौती, फुलवती, कर्मभूमी यांसारख्या अनेक मालिकांमध्ये देखील त्या झळकल्या आहेत. मॅरिड टू अमेरिका या २०१२ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्या शेवटच्या झळकल्या होत्या. त्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत आपल्या कुटुंबियांसोबत राहात आहेत.

अर्चना या चित्रपटसृष्टीपासून दूर असल्या तरी त्या आजही नृत्याची आवड जोपासत आहेत. अर्चना नृत्यालयच्या मार्फत त्या कथ्थकचे धडे आजही देतात. त्या चित्रपटात काम करत नसल्या तरी सोशल मीडियाद्वारे त्या त्यांच्या फॅन्सच्या संपर्कात असतात. त्यांच्या डान्स स्कूलच्या कार्यक्रमाचे अनेक फोटो आपल्याला त्यांच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर पाहायला मिळतात.

टॅग्स :सेलिब्रिटी