Join us
Daily Top 2Weekly Top 5

गौरव घाटणेकर आणि नसिरुद्दीन शहा यांचे अनोखे नाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2017 14:02 IST

गौरव घाटणेकरचा काय रे रास्कला हा चित्रपट सध्या चांगलाच गाजत आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे सगळेच कौतुक करत आहेत. ...

गौरव घाटणेकरचा काय रे रास्कला हा चित्रपट सध्या चांगलाच गाजत आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे सगळेच कौतुक करत आहेत. गौरव एक चांगला अभिनेता असल्याचे त्याने त्याच्या आजवरच्या कारकिर्दीतून सिद्ध केले आहे. गौरवच्या या अभिनयाच्या कारकिर्दीत त्याचे गुरू कोण आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेते त्याचे गुरू असून त्याच्या गुरूंसोबत त्याचे खूप छान नाते आहे.गौरव घाटणेकरने व्हिसलिंग वूड्समधून मास्टर्स इन अॅक्टिंग ही पदवी घेतली आहे. तिथे अडीज वर्षं नसिरुद्दीन शहा त्याला शिकवायला होते. तेव्हापासूनच गौरव आणि नसिरुद्दीन शहा यांच्यामते गुरू-शिष्याचे एक खूप छान नाते जमले आहे. गौरवला ते शिकवत असतानाचा एक भन्नाट किस्सा त्याने सांगितला आहे. तो सांगतो, आम्हाला त्यावेळी आमचे शिक्षक काही असाइनमेंट देत असत. मला त्यांनी एकदा एकट्याला कब्रस्तानमध्ये जायला सांगितले होते आणि तिथे गेल्यानंतर काय जाणवले हे वर्गात आल्यावर अभिनयातून दाखवायचे असे त्यांनी मला सांगितले होते. त्यावेळी त्यांनी माझ्या आई-वडिलांचा फोन नंबर देखील माझ्याकडून घेतला होता. तू गेला की नाही हे मी तुझ्या घरातल्यांना विचारणार असे त्यांनी मला सांगितले होते. गौरवने नसिरुद्दीन शहा यांच्यासोबत नाटकांमध्ये देखील काम केले आहे. अभिनयाबाबत त्याला आजही नसिरुद्दीन शहा मार्गदर्शन देतात. याविषयी गौरव सांगतो, माझ्या अभिनयाविषयी ते मला अनेकवेळा काही गोष्टी सांगतात. एखाद्या भूमिकेविषयी माझ्याशी गप्पा मारतात. मी देखील त्यांना त्यांच्या भूमिकेविषयी विचारतो, एखाद्या दृश्यात तुम्ही अशाप्रकारे अभिनय का केला होता, देहबोली अशाप्रकारे का आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी मी त्यांना विचारतो आणि ते देखील प्रत्येक गोष्ट मला समजवून सांगतात. आमच्यात गुरू-शिष्याचे एक अनोखे नाते आहे.