Join us

नवोदित कलाकारांसाठी अनोखा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2016 11:06 IST

चित्रपटसृष्ट्रीकडे येऊ पाहणाºया नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावे  त्याचप्रमाणे हौशी व प्रायोगिक नाटयसंस्था यांच्यासाठी अस्तित्व आणि मुंबई थिएटर गाइड यांच्या ...

चित्रपटसृष्ट्रीकडे येऊ पाहणाºया नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावे  त्याचप्रमाणे हौशी व प्रायोगिक नाटयसंस्था यांच्यासाठी अस्तित्व आणि मुंबई थिएटर गाइड यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत पॉकेट थिएटर म्हणजेच छोटी नाटयगृहे उभारली जाणार आहेत. अशी माहिती अस्तित्वचे रवी मिश्रा यांनी दिली.नाटयकलेशी संबंधित विविध उपक्रम सातत्याने राबविणाºया अस्तित्व या संस्थेचा येत्या २७ डिसेंबर रोजी २० वा वर्धापन दिन आहे. पॉकेट थिएटर हा याच उपक्रमाचा एक भाग आहे. मुंबईत मालाड येथे क्लॅपआणि गोरेगाव येथे पीटारा या नावाने आम्ही अशी छोटी नाटयगृहे उभारली आहेत. या दोन्ही नाटयगृहांना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नाटक करणारे समूह, हौशी व प्रायोगिक नाटयसंस्था यांच्याकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुमारे शंभर ते सव्वाशे आसनक्षमता असलेला छोटया नाटयगृहांचा प्रयोग यशस्वी ठरला असल्याचे सांगून मिश्रा म्हणाले, मुंबईत अंधेरी येथे लोखंडवाला संकुल, वांद्रे व लोअर परळ येथे अशा प्रकारची आणखी तीन नाटयगृहे उभारणार आहोत. ग्रॅण्ट वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमासाठी खुली एकांकिका स्पर्धा व पथनाटये हा अस्तित्वचा पहिला मोठा उपक्रम होता. नाटयदर्पण रजनीतर्फे घेण्यात येणाºया कल्पना एक आविष्कार अनेक या गाजलेल्या स्पधेर्चे आम्ही पुनरुज्जीवन केले. पहिल्याच वर्षी ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांनी सुचविलेल्या कठीण  होत आहे रे या काव्यपंक्तींवर आधारित नाटके सादर झाली. मुंबई विद्यापीठाच्या सहकायार्ने पारंगत सन्मान, चांगले लेखक घडविण्यासाठी नाटयलेखन शिबीर आम्ही आयोजित केले होते. अस्तित्व आणि मुंबई थिएटर गाइड यांच्या  संयुक्त विद्यमाने ई नाटयशोध ही आॅनलाइन एकांकिका स्पर्धा हाही आमचा एक वेगळा प्रयोग आहे. त्याच बरोबरीने ई नाटयसंहिता लेखन स्पर्धा, चर्चा, परिसंवाद, मुलाखती यांचा समावेश आहे.