Join us  

उमेश कामतने प्रिया बापटसोबतचा फोटो केला शेअर, म्हणाला - 'दोघांच्या तब्येतीत होतेय सुधारणा'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 12:41 PM

उमेश कामत आणि प्रिया बापट यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान आता उमेश कामतने त्या दोघांच्या तब्येतीची अपडेट इंस्टाग्रामवर दिली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजेच उमेश कामत आणि प्रिया बापट यांना कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती खुद्द त्यांनीच इंस्टाग्रामवर दिली होती. त्या दोघांच्या चाहत्यांना त्यांच्या तब्येतीची खूप काळजी वाटत होती आणि त्यांना लवकर बरे वाटावे, म्हणून प्रार्थना करत आहेत. दरम्यान आता उमेश कामतने त्या दोघांच्या तब्येतीची अपडेट इंस्टाग्रामवर दिली आहे.

उमेश कामतने इंस्टाग्रामवर त्याचा आणि प्रियाचा फोटो शेअर करत लिहिले की, जे सौंदर्य तूला माझ्यात दिसते ते तूझे प्रतिबिंब आहे. - रुमी असे लिहित उमेशने त्यांच्या तब्येतीबद्दल सांगितले. तो म्हणाला की तुमच्या सगळ्यांचे प्रेम आणि सदिच्छांसाठी मी आभारी आहे. ते आम्हाला लवकर बरे करण्यासाठी मदत करत आहेत. आमच्या दोघांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. गणपती बाप्पा मोरया.

काही दिवसांपूर्वी प्रिया बापटने तिचा आणि उमेश कामतचा फोटो सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, कायमच एकत्र! चांगल्या आणि वाईट काळात. इतके प्रेम आणि सदिच्छा दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे. आमच्या दोघांच्या तब्येतील सुधारणा होते आहे. अशीच सदिच्छा देत रहा.

उमेश कामत आणि प्रिया बापटने १७ मार्च रोजी सोशल मीडिया इंस्टाग्राम स्टोरीवर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. उमेशने लिहिले की, दुर्देवाने प्रिया आणि माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आम्ही दोघे होम क्वारंटाइन आहोत. आम्ही दिलेल्या सूचनेनुसार उपचार आणि काळजी घेत आहोत. कृपया मागील आठवड्याभरात आमच्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतः जाऊन कोरोनाची टेस्ट करून घ्यावी किंवा स्वतःला आइसोलेट करून घ्या.

उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी नुकतीच आणि काय हवे या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरूवात केली होती. ही माहिती खुद्द त्यांनीच सोशल मीडियावर दिली होती.

टॅग्स :उमेश कामतप्रिया बापटकोरोना वायरस बातम्या