Join us
Daily Top 2Weekly Top 5

"एक महिन्यापासून गर्लफ्रेंड बोलत नाही, ब्लॉक केलंय", उमेश कामतला चाहत्याचा मेसेज, अभिनेता म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 12:10 IST

चाहत्यांच्या प्रतिक्रियेने कलाकारांचे मेसेज बॉक्स अगदी भरलेले असतात. पण, एका मराठी अभिनेत्याला चाहत्याने भलताच मेसेज केला आहे. 

आपल्या आवडत्या कलाकारांना चाहते सोशल मीडियावर फॉलो करतात. बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच मराठी कलाकारांचीही सोशल मीडियावर क्रेझ आहे. अनेकदा चाहते कलाकारांबद्दलचं प्रेम पोस्टद्वारे व्यक्त करताना दिसतात. तर कधी कलाकारांच्या पोस्टवरही कमेंट्स दिसतात. काही कलाकार यातील चाहत्यांच्या कमेंटला उत्तरही देतात. चाहत्यांच्या प्रतिक्रियेने कलाकारांचे मेसेज बॉक्स अगदी भरलेले असतात. पण, एका मराठी अभिनेत्याला चाहत्याने भलताच मेसेज केला आहे. 

उमेश कामत हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय नाव आहे. मालिका, सिनेमा, नाटक आणि वेब सीरिज अशा सगळ्याच माध्यमांमध्ये त्याने काम केलं आहे. उमेश सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. एका चाहत्याने उमेशला इन्स्टाग्रामवर मेसेज करत त्याची व्यथा मांडली आहे. याचा फोटो उमेशने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला आहे. "माझी गर्लफ्रेंड नाराज झाली आहे. गेले एक महिना ती माझ्याशी बोलत नाहीये. तिला बोल म्हणतोय तरी बोलत नाही. तिने मला ब्लॉक केलं आहे. दुसऱ्या नंबरने मेसेज केला तरी ऐकत नाहीये," असा मेसेज चाहत्याने उमेशला केला होता. 

चाहत्याच्या या मेसेजल काय रिप्लाय करायचा हे उमेशलाही कळत नाहीये. इन्स्टा स्टोरी शेअर करत त्याने "याला मी कशी बरं मदत करू?" असं म्हटलं आहे. उमेशच्या या स्टोरीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या उमेश जर तरची गोष्ट या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यग्र आहे. या नाटकात प्रिया बापटही मुख्य भूमिका साकारत आहे. 

टॅग्स :उमेश कामतमराठी अभिनेता