Join us

दोन बहिणींचा 'फॅंमिली कट्टा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2016 18:48 IST

                'फॅमिली कट्टा' हा चित्रपटातून कुटुंबातील नात्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला ...

 
               'फॅमिली कट्टा' हा चित्रपटातून कुटुंबातील नात्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे हे आपल्याला माहिती आहे. पण या चित्रपटाची निर्मिती कोणी केली आहे हे तुम्हाला माहिती आहे का ? या चित्रपटाची निर्मिती चित्रपटसृष्टीतील दोन बहिणींनी केलीय. अभिनेत्री वंदना गुप्ते आणि राणी वर्मा यांनी हे शिवधनुष्य पेलण्याचे काम केले आहे. वंदना आणि राणी या दोन बहिणींनी स्वत:चे सिस्टर कन्सर्न नावाचे प्रोडक्शन हाऊस उघडले आहे. या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत रिलीज होणार फॅंमिली कट्टा हा पहिला चित्रपट आहे. वंदना गुप्ते यांनी आजपर्यंत अनेक चित्रपट, नाटके, मालिका यांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. तर बहीण राणी वर्मा याही उत्तम गायिका आहेत. आता या दोन बहिणींनी आणलेला हा पहिलाच चित्रपट प्रेक्षकांना किती आवडतोय हे आपल्याला लवकरच समजेल.