Join us
Daily Top 2Weekly Top 5

मानसी नाईकच्या घरात आले दोन नवे सदस्य, जाणून घ्या कोण आहेत ते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 16:34 IST

मानसीला प्राण्यांची खूप आवड असून सध्या तिच्या घरी नवीन दोन पाहुणे आले आहेत.

ठळक मुद्देमानसीने मांजरीच्या पिल्लांसोबत शेअर केला फोटो

 'बघतोय रिक्षावाला...' असे म्हणत आपल्या तालावर सर्वांना थिरकायला लावणारी अभिनेत्री मानसी नाईकने आपल्या नृत्याने रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. मानसीला प्राण्यांची खूप आवड असून सध्या तिच्या घरी नवीन दोन पाहुणे आले आहेत. कोण असतील हे पाहुणे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना... तिने या पाहुण्यांची ओळख सोशल मीडियावर करून दिली आहे. मानसीकडे दोन मांजरीची पिल्ले असून रोमियो व जास्मीन अशी त्यांची नावे आहेत. 

मानसीने मांजरीच्या पिल्लांसोबत फोटो शेअर करून लिहिले की, 'माझ्या इंस्टाग्राम कुटुंबातील सहा लाख सदस्यांची रोमियो व जास्मीनसोबत ओळख करून देते. मी खूप खूश आहे. मला सदैव पाठिंबा देण्यासाठी मी आभारी आहे. असेच प्रेम व पाठींबा देत रहा.'

मानसीचे प्राण्यांवर खूप प्रेम असल्याचे सोशल मीडियावरील पोस्टमधून पाहायला मिळते. नुकतेच तिने कोकरूसोबत फोटो टाकले आहेत. 

मानसी नाईक हिने प्रेक्षकांना आपल्या नृत्याच्या अदांनी घायाळ केले आहे. 'बघतोय रिक्षावाला' म्हणत तिने मराठी प्रेक्षकांना आपल्या तालावर डोलायला लावले. ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅॅॅॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून अभिनेत्री मानसी नाईकच्या रूपाने मराठी इंडस्ट्रीला एक चांगली नृत्यांगना मिळाली आहे. त्याचबरोबर एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाचीदेखील ओळख तिने करून दिली आहे.  

टॅग्स :मानसी नाईक