Join us

पोलिसांच्या दोन भन्नाट शौर्यकथा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 17:33 IST

 "शौर्य- गाथा अभिमानाची” या कार्यक्रमात आपण महाराष्ट्र पोलिसांचे शौर्य आणि त्यांची गुन्हे सोडवण्याची क्षमता किती उत्तुंग पातळीवर आहेत हे ...

 "शौर्य- गाथा अभिमानाची” या कार्यक्रमात आपण महाराष्ट्र पोलिसांचे शौर्य आणि त्यांची गुन्हे सोडवण्याची क्षमता किती उत्तुंग पातळीवर आहेत हे पाहिलेत. या वर्षाच्या शेवटी, पोलीस इतिहासातील पहिले एन्काउंटर आणि विविध देशात अनेक गुन्हे करून फरार असलेला इंटरनेशनल क्रिमिनल अश्या दोन शौर्य कथा आपल्याला पाहायला झी युवावरील शौर्य-गाथा अभिमानाचीमध्ये पाहायला मिळणार आहेत. या आठवड्यात शुक्रवार ३० डिसेंबरला पोलिसांचा निर्भीड चेहरा, निवृत्त पोलीस सहाय्यक आयुक्त इसाक बागवान यांनी कुविख्यात गुंड मन्या सुर्वे याचे केलेले एन्काउंटर आणि शनिवार ३१ डिसेंबरला निवृत्त पोलीस सहाय्यक आयुक्त मधुकर झेंडे यांनी कशाप्रकारे शिताफीने ‘बिकिनी किलर. चार्ल्स शोभराजला अटक केली हि रंजक कथा आपल्याला पाहायला मिळणार आहेत.   मन्या सुर्वे आणि चार्ल्स शोभराज हि दोन्ही नावे गुन्हेगारी जगतातील मोठी नावे, पण या नावांच्याच्याही वर या गुन्हेगारीचा खातमा आणि पकडणारी नावे आहेत, ती म्हणजे निवृत्त पोलीस सहाय्यक आयुक्त इसाक बागवान आणि निवृत्त पोलीस सहाय्यक आयुक्त मधुकर झेंडे.  मान्याने १० वर्षे पोलिसांच्या हातावर तुरी देत मुंबईत आपली दहशत माजवली, ऍसिड बल्ब, माऊझर बॉम्ब अशी प्राणघातक हत्यारे बाळगणारा मन्या खुल्लेआम बँका लुटायचा, खंडण्या गोळा करायचा. हा मुंबई पोलिसासाठी एक डोकेदुखी बनला होता. मुंबई सीआयडीने मन्याच्या प्रेयसीमार्फत त्याचा माग काढला व त्याचा काटा काढण्याचे ठरविले.या मन्याला ११ जानेवारी, १९८२ इसाक बागवान यांनी दुपारी १:३० वाजता वडाळा बस डेपो आणि आंबेडकर कॉलेजच्या परिसरात इतर पोलीस अधिकाऱयांच्या सहाय्याने घेरले आणि त्याचा भारतीय गुन्हेगारी जगतातील, पहिला लाईव्ह एनकाऊंटर केला.  चार्ल्स शोभराज हा विविध देशात अनेक गुन्हे करून फरार असलेला इंटरनेशनल क्रिमिनल होता. भारत देश पाहण्यासाठी आलेले परदेशी पर्यटक हे त्याचे मुख्य टार्गेट असायचे. अय्याशीसाठी स्वतःच्या रूपाची आणि बोलण्याची छाप परदेशी तरुणींवर पाडून त्यांना आपल्या जाळ्यात ओढून चार्ल्स आपली भूक भागवत असे. आणि नंतर त्यांचा खून करीत असे. पैश्यासाठी वाट्टेल त्या थराला जाणारा हा गुन्हेगार बेकायदा मार्गाने शस्त्र आणून तो गुन्हे करण्यात वाकबदार होता. विकृत स्वभावाच्या या गुन्हेगाराने गुन्हे देशात केले आणि तिथून निसटून सुद्धा आला. साऱ्या जगाला जेरीस आणणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या आवळून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या, महाराष्ट्राचा वाघ मधुकर झेडे यांनी ज्या प्रकारे सापळा लावून पकडले. अशा या दोन रंजक कथा आपल्याला पाहायला मिळणार आहे.