Join us

​‘सैराट’चा ट्रेलर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 18:04 IST

संघर्ष आणि मिलनाची विलक्षण प्रेमकथा दर्शविणारा बहुचर्चित नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच आऊट झाला.

संघर्ष आणि मिलनाची विलक्षण प्रेमकथा दर्शविणारा बहुचर्चित नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच आऊट झाला. आधीच ‘सैराट’ च्या गाण्यांनी सर्वांना वेड लावलं असताना आता ह्या ट्रेलरची भर पडलीय.ट्रेलर पाहताच चित्रपट हा महाविद्यालयीन तरुण-तरूणीच्या हळूवार प्रेमकथेवर आधारित आहे असे वाटते. ग्रामीण भागावर आधारीत नागराज ही कथा सुद्धा जातीपातीवर भाष्य करते. नवोदित अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर ह्यांच्या हटके अभिनय चित्रपटात पाहायला मिळणार हे नक्की. ‘सैराट’ हा येत्या २९ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.