Join us

‘लाल इश्क’ चा ट्रेलर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2016 21:19 IST

निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी प्रोडक्शनचा पहिला वहिला मराठी चित्रपट ‘लाल इश्क’ गुपीत आहे साक्षीला, अशी टॅगलाईन घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी प्रोडक्शनचा पहिला वहिला मराठी चित्रपट ‘लाल इश्क’ गुपीत आहे साक्षीला, अशी टॅगलाईन घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमातील संपूर्ण कलाकारांच्या उपस्थितीत ट्रेलर नुकताच उलगडला. मराठमोळा सुपरस्टार स्वप्निल जोशी आणि हिंदी अभिनेत्री अंजना सुखानी ही जोेडी सिनेमात एकत्र झळकतेय. यावेळी सई ताम्हणकर, मुक्ता बर्वे आणि सोनाली कुलकर्णी ह्या सुपरस्टार नायिकांनी खास हजेरी लावली होती. स्वप्ना वाघमारे-जोशी दिग्दर्शित ‘लाल इश्क’ च्या ह्या पोस्टरवर दोन प्रेमी जीवांच्या उत्कट प्रेमाची प्रतिकृती पाहायला मिळते. स्वप्नील जोशी आणि हिंदी अभिनेत्री अंजना सुखानी यांचे ब्लॅक आऊटफिट्स मधील हे मनमोहक पोस्टरदेखील लक्ष वेधुन घेते. पोस्टरवरुन सिनेमा रोमान्स थ्रीलर असल्याचं लक्षात येत आहे. हा चित्रपट येत्या २७ मे ला प्रदर्शित होत आहे.