करार या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 12:37 IST
मनोज कोटियान दिग्दर्शित करार या चित्रपटाची चर्चा रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये मराठी चित्रपटसृष्टीचे तगडे कलाकार सुबोध भावे, क्रांती रेडकर, उर्मिला कोठारे यांचा समावेश आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
करार या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
मनोज कोटियान दिग्दर्शित करार या चित्रपटाची चर्चा रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये मराठी चित्रपटसृष्टीचे तगडे कलाकार सुबोध भावे, क्रांती रेडकर, उर्मिला कोठारे यांचा समावेश आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. आयुष्यात कशी वेळ येऊ शकते? कसा गुंता निर्माण होऊ शकतो? या सर्व गोष्टींवर भाष्य करणारा एका वेगळ्या धाटणीचा करार हा चित्रपट प्रेक्षकांना १३ जानेवारीला भेटीला येणार आहे. क्रॅक एंटरटेनमेंटच्या पूनम सिव्या यांची पहिलीच निर्मिती असलेला हा चित्रपट असणार आहे. वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाची कथा संजय जगताप यांनी लिहिली असून पटकथा आणि संवाद हेमंत एदलाबादकर यांचे आहेत. आयुष्याला व्यवहाराच्या नजरेतून पाहणाºया लोकांवर टीका करणाºया करार या चित्रपटाचा म्युझिकच्या पाठोपाठ आता हा ट्रेलरदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तसेच परेश दवे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहे. समाजात विशिष्ट नाव आणि ओळख बनवण्यासाठी स्वत:च्या पत्नीच्या भावनांचा अनादर करणाºया एका करारबद्ध तरुणांची कथा या चित्रपटात मांडली आहे. तसेच मातृत्व मिळवण्यासाठी एका स्त्रीची होत असलेली तडफड आणि त्यासाठी केला जाणारा व्यवहार या चित्रपटाचा महत्वाचा सार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर सोबतच चित्रपटातील गाणीदेखील प्रेक्षकांना रोमांचित करणारी आहेत. या गाण्यांचे गुरु ठाकूर आणि मंगेश कांगणे यांनी लेखन केले आहे. संगीतदिग्दर्शक विजय गवंडे आणि परेश शाह यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांना अवधूत गुप्ते, श्रेया घोषाल, बेला शेंडे, सोनू कक्कर, जसराज जोशी, नेहा राजपाल आणि वैशाली सामंत अशा सुरमयी गायकांचा आवाज लाभला आहे.