Join us

पुष्कराज चिरपुटकर बनणार दिग्दर्शक ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 12:05 IST

सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये अभिनयातून दिग्दर्शनाकडे पाऊल टाकणाºया कलाकारांचे प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहेत. कारण नुकतेच काही दिवसांपूर्वी अभिनेता ...

सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये अभिनयातून दिग्दर्शनाकडे पाऊल टाकणाºया कलाकारांचे प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहेत. कारण नुकतेच काही दिवसांपूर्वी अभिनेता प्रथमेश परब याने एक लघुपट दिग्दर्शित केला होता. आता या कलाकाराच्या पाठोपाठ आता, प्रेक्षकांचा लाडका कलाकार आशू म्हणजे पुष्कराज चिरपुटकर हा देखील दिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे कळत आहे. त्याने सध्या एका लघुपटाचं दिग्दर्शन केले असल्याचे समजत आहे. तसेच तो सध्या त्या चित्रपटाच्या एडिटिंगमध्ये व्यग्र असल्याचे कळत आहे. मात्र त्याच्या या लघुपटाचे नाव अदयाप ही गुलदस्त्यात आहे. त्याचप्रमाणे त्याच्या या लघुपटामध्ये कोण कलाकार झळकणार हे देखील कळाले नाही. पण पुष्कराजची ही नवीन इनिंग पाहण्यासाठी त्याचे चाहतेदेखील उत्सुक असणार हे मात्र खरं. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून आशू म्हणजेच पुष्कराज चिरपुटकर याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याची ही मालिका खूपच गाजली होती. तसेच त्याची आशूची भूमिकादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या मालिकेत त्याच्यासोबत अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, पूजा ठोंबरे आणि स्वानंदी टिकेकर हे कलाकार पाहायला मिळाले. या सर्व कलाकारांनी छोटया पडदयावर कल्ला केला असल्याचे दिसले. त्यांची ही मालिका पुन्हा कधी सुरू होणार याच्या प्रतिक्षेत अजूनही प्रेक्षक असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच त्याने नुकतेच काही दिवसांपूर्वी त्याने बॉलिवूड चित्रपटामध्येदेखील पदापर्ण केले आहे. बुधिया सिंग: बॉर्न टू रन असे या चित्रपटाचे नाव होते. तसेच तो एक आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र असल्याचे कळत आहे.