Join us

अकुंश चौधरी याचा आज वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2017 11:27 IST

प्रेक्षकांचा लाडका कलाकार अकुंश चौधरी याचा आज वाढदिवस आहे. या अभिनेत्याने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. ...

प्रेक्षकांचा लाडका कलाकार अकुंश चौधरी याचा आज वाढदिवस आहे. या अभिनेत्याने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा कलाकार म्हणून अंकुश चौधरीकडे पाहिले जाते.                       सुना येती घरा या चित्रपटाच्या माध्यमातून या अभिनेत्याने मराठी चित्रपटसृष्टीत पदापर्ण केले आहे. यापूर्वी १९८९ -९० दरम्यान महाराष्ट्राची लोकधारापासून त्याने आपल्या करियरचा प्रवास सुरू केला. आॅल द बेस्ट या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर पदापर्ण केले. त्याचबरोबर हसा चकट फू या कार्यक्रमातून छोटया पडदयावर पदापर्ण केले. हा कार्यक्रम दिग्दर्शक केदार शिंदे यांचा होता. हा कार्यक्रम मोठया प्रमाणात प्रेक्षकांच्या पसंतीसदेखील पडला होता. तसेच आभाळमाया आणि बेधुंद मनाच्या लहरी या मालिकेतूनदेखील अकुंश चौधरी प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला दुनियादारी या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले. या चित्रपटातील त्याची डी एस पीची भूमिका प्रेक्षकांना अधिक भावली. या चित्रपटासाठी त्याला  उत्कृष्ट सहकलाकार म्हणून पुरस्कारदेखील मिळाला आहे.            जत्रा, मातीच्या चुली, आई शप्पथ, यांचा काही नेम नाही, यंदा कर्तव्य आहे, माझा नवरा तुझी बायको, चेकमेट, उलाढाल, रिंगा रिंगा, लालबाग परळ, प्रतिबिंब असे अनेक सुपरहीट चित्रपट अंकुश चौधरी याने मराठी चित्रपटसृष्टीला दिली आहेत.  तसेच त्याने अभिनयाबरोबरच दिग्दर्शकाचीदेखील जबाबदारी पार पाडली आहे. केदारबरोबर त्याने अगंबाई अरेच्चा आणि जत्रा या चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले. तसेच साडे माडे तीन चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. इतकेच नाही तर त्याने बॉलिवुडमध्येदेखील आपल्या अभिनयाची जादू निर्माण केली आहे. जिस देश मे गंगा रेहेता है हा त्याचा पहिला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात तो बॉलिवुडचा तगडा कलाकार गोविंदासोबत झळकला होता.               २०१७ ची सुरूवात अंकुशसाठी खास ठरली आहे. कारण या वर्षाची सुरूवातच त्यांची ती सध्या काय करते या सुपरहीट चित्रपटाने झाली. या चित्रपटात त्याच्यासोबत तेजश्री प्रधान, अभिनय बेर्डे, आर्या आंबेकर हे कलाकार पाहायला मिळाले. प्रेक्षकांच्या या लाडक्या कलाकाराला लोकमत सीएनएक्स मस्तीच्यावतीने  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.