दमलेल्या बाबांच्या कहानीचा टिझर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 19:48 IST
पालवी क्रिएशन्स प्रस्तुत, विशाल धनवडे आणि नितीन चव्हाण निर्मित आणि नितीन चव्हाण दिग्दर्शित ‘दमलेल्या बाबाची कहानी’ या चित्रपटाचा ट्रेलर ...
दमलेल्या बाबांच्या कहानीचा टिझर प्रदर्शित
पालवी क्रिएशन्स प्रस्तुत, विशाल धनवडे आणि नितीन चव्हाण निर्मित आणि नितीन चव्हाण दिग्दर्शित ‘दमलेल्या बाबाची कहानी’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहायची वेळ आली आहे. हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यामुळे मुलगी आणि बाबा यांचं नातं चित्रपटात कसं दाखवणार हे या झलक मध्ये पाहायला मिळणार आहे. गीतकार संदिप खरे यांनी वडिलांची भूमिका केली आहे आणि संदिप खरे यांच्या मुलीची भूमिका अभिनेत्री संस्कृती बालगुडेनी केली आहे. यांच्यासोबत आस्ताद काळे, ज्योती चांदेकर, दीप्ती भागवत आणि प्रवीण तरडे आदी कलाकारांचा पण अभिनय आपणांस पाहायला मिळणार आहे. संदिप खरे आणि संस्कृतीला वडील आणि मुलींच्या भूमिकेत पाहायला बरेच प्रेक्षक आतुर आहेत. एका गोड नात्याची सुंदर गोष्ट ‘दमलेल्या बाबाची कहानी’ या चित्रपटातून येत्या १० जून रोजी बघायला मिळेल