Join us
Daily Top 2Weekly Top 5

साऊथची ही अभिनेत्री करतेय मराठी कलाविश्वात पदार्पण, जाणून घ्या तिच्याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 16:55 IST

आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे या मराठी सिनेमात ती झळकणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर रिलीज झालं आहे.

साऊथची सुपरस्टार मेघा शेट्टी लवकरच मराठी सिनेमात पदार्पण करतोय. मेघा शेट्टी ही कन्नड टीव्ही आणि सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मेघाची जोथे जोलाई ही मालिका चांगलीच गाजली होती. ट्रायबल रायडींग आणि दिलपसंद या सिनेमातही मेघाने काम केले आहे. कन्नड इंडस्ट्रीतील सर्वात व्यस्त अभिनेत्री म्हणून मेघाचे नाव घेतले जाते.  

दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्री यांची निर्मीती असलेला आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे रोमँटिक -एक्शनपट आहे. या सिनेमात कन्नड स्टार कवीश शेट्टी मुख्य भूमिकेत आहे आणि त्याचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर आता या सिनेमातील नायिका मेघा शेट्टी हिचे पोस्टर प्रदर्शित कऱण्यात आले आहे. 

आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा सिनेमा मराठी आणि कन्नड भाषेत चित्रीत झाला आहे. तर हिंदी, तमिळ, तेलगु, मल्याळम या भाषेतही हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात कन्नड कलाकार कवीश शेट्टी,  मेघा  शेट्टी या सोबत मराठीतील शिवानी सुर्वे, विराट मडके या कलाकारांचा समावेश आहे.सदागरा राघवेंद्र यांनी हा सिनेमा दिग्दर्शीत केला आहे. हा सिनेमा जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होईल. 

टॅग्स :सेलिब्रिटीTollywood