Join us

'जारण'मधील 'गगुंटी' या भूमिकेची अनिता दातेनं अशी केली तयारी, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 18:41 IST

Anita Date : अनिता दाते अलिकडेच 'जारण' सिनेमात पाहायला मिळाली. तिने या चित्रपटात गंगुटीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला आणि तिने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

अनिता दाते (Anita Date) मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आजपर्यंत विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. अलिकडेच ती 'जारण' (Jarann Movie) सिनेमात पाहायला मिळाली. तिने या चित्रपटात गंगुटीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला आणि तिने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता तिने दिलेल्या एका मुलाखतीत या चित्रपटातील भूमिकेची तयारी कशी केली याबद्दल सांगितले.

अनिता दाते हिने आरपार ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, जारणच्या भूमिकेचा विचार केल्यावर मला ललित कला केंद्रच आठवतं पुन्हा मला माझ्या सरांनी भूमिकेकडे कसं बघायला शिकवलंय. तर ती का आहे. गंगुटी का आहे, तिचं चित्रपटातील स्थान काय आहे. ती कशासाठी आहे. ती काय परिणाम करुन देणार आहे. ती कुठून आलीये. तिची बोलीभाषा काय, तिची देहबोली काय, या सगळ्याचा मी विचार करु लागते. 

ती पुढे म्हणाली की, मी एक प्रशिक्षित अभिनेत्री आहे. मी केवळ दिग्दर्शकांनी मला हे कपडे दिलेत म्हणून मी घातलेत आणि मी इथे गेले असं नाही. हीच गोष्ट ज्यांनी प्रशिक्षण घेतलं नाहीये. त्याही मुली सरावाने करु लागतात. पण हे मला प्रशिक्षणाने या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला लावलेला आहे. मग मी तिची भाषा शोधते. मग तिची मी बॅकस्टोरी तयार करते. ती कोण असेल काय असेल. स्वतःला प्रश्न विचारते टेक्स्टमधलं सबटेक्स्ट शोधते. आता हे मी नावं घेतीये सबटेक्स्ट. तू कदाचित सबटेक्स्ट नाही म्हणणार अन् तरी सुद्धा शोधशीलच पण त्याच्यासाठी तुला सराव करायला लागेल. पण मला माझ्या शिक्षकांनी मला ते दोन वर्षांमध्ये तीन वर्षांमध्ये याचा अभ्यास करण्यासाठी तयार केलेलं आहे.    

टॅग्स :अनिता दाते