दोन जोडप्यांमधील भांडणं, रुसवा पावसाच्या आगमनामुळे निघून जातो आणि त्यांच्यात दुरावा येण्याऐवजी जवळीक जास्त निर्माण होते. विजू माने यांच्या नवीन प्रकल्पात ही अशीच काहीशी गोष्ट आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे असं वाटतंय.
“‘त्या’ च्या आणि ‘ति’ च्या गोष्टीतलं...मनातलं काहीतरी...काहीही” नक्की हे काय आहे याविषयी माहिती अजून गुलदस्त्यात आहे. पण एक छान सरप्राईज विजू माने प्रेक्षकांना देणार आहेत. स्ट्रगलर साला या वेब शो नंतर विजू माने यांचा हा नवीन प्रकल्प म्हणजे मनोरंजनाची मेजवाणीच असते.
टूमॉरो- इव्हेंट अँड मिडीया यांची प्रस्तुती असणा-या या नवीन प्रकल्पाविषयी ९ जुलै रोजी प्रेक्षकांना कळेल