Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताई फिल्मस प्रॉडक्शन अंतर्गत हे दोन लघुपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 16:19 IST

नाटक, मालिका आणि चित्रपटांप्रमाणेच सध्या लघुपटाचीदेखील क्रेझ निर्माण झाली आहे. एकापाठोपाठ एक लघुपट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. हिंदी असो ...

नाटक, मालिका आणि चित्रपटांप्रमाणेच सध्या लघुपटाचीदेखील क्रेझ निर्माण झाली आहे. एकापाठोपाठ एक लघुपट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. हिंदी असो या मराठी लघुपट तितक्याच आवडीने प्रेक्षक या लघुपटास पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आता हेच पाहा ना, दिग्दर्शन उदयसिंह विश्वकर्मा यांनीदेखील दोन हिंदी लघुपट दिग्दर्शित केले आहेत.              मुक्ताई फिल्मस प्रॉडक्शन अंतर्गत हे दोन लघुपट आहेत. नुकत्याच या दोन हिंदी लघुपटाचे चित्रिकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. शक आणि गुलामी असे या लघुपटाचे नाव आहे. हे दोन्ही लघुपट बीड नॅशनल आर्ट फिल्मस आणि सांगली नॅशनल आर्ट फिल्मस  फेस्टीव्हलमध्ये पाठविण्यात आले आहेत.  हे दोन्ही लघुपट नक्कीच समाजपरिवर्तन करणारे असणार आहेत. या लघुपटांची कथा पटकथा शमशाद खान यांनी लिहीली असून, त्याचे संवाद उदयसिंह विश्वकर्मा आणि बालाजी इके यांचे आहेत. तसेच गीतकार तानाजी जाधव, बाळकृष्ण कुचेकर, बालाजी इके आहेत. या गीतांना प्रदीप कांबळे यांनी संगीत दिले आहेत. तर निशिकांत परदेशी आणि पहल सिंग यांनी स्वर साज चढविले आहेत.         या लघुपटाचे दिग्दर्शन उदयसिंह विश्वकर्मा यांनी केले असून निर्माते मुकुंद सातव आहेत. हे लघुपट नक्कीच प्रेक्षकांच्या ही पसंतीस उतरेल अशी आशा करूयात. सध्या वेबसीरीजप्रमाणेच लघुपटांची चलती आहे. ज्याप्रमाणे एकापाठोपाठ एक वेबसीरीजमध्ये इंडस्ट्रीमध्ये येऊ पाहात आहेत. त्याचप्रमाणे लघुपटदेखील मोठया प्रमाणात येत असल्याचे दिसत आहेत. इतकेच नाही तर हे लघुपट प्रेक्षकांचे लाडके कलाकार स्वत: दिग्दर्शित करणार आहेत. अभिनेत्री स्मिता तांबेदेखील स्वत: लघुपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचे समजत आहे.