वाजले की बारा म्हणत अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठी रसिकांना अक्षरक्षा वेड लावले. मराठी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे. अमृता खानविलकरचा अभिनय आणि नृत्य यावर रसिक तितकेच फिदा आहेत. मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. पती हिमांशूसह तिने डान्स रियालिटी शोनच बलियेचे विजेतेपदसुद्धा पटकावलं होते. अमृताने टीव्ही अभिनेता हिमांशू  मल्होत्रासह लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली आहे. या दोघाची जोडी रसिकांना खूप आवडते. त्यांच्यामध्ये खूप मस्त रोमँटीक केमिस्ट्री पाहायला मिळते. या दोघांच्या फोटोंवर चाहते भरभरून कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात. खरंतर सोशल मीडियावर हिमांशूचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.  तरूणीतर त्याच्यावर अक्षरक्षः जीव ओवाळून टाकतात. जेव्हा अमृतासह हिमांशू लग्नाच्या बेडीत अडकला तेव्हा नक्कीच अनेक तरूणींचा हिरमोड झाला असणार हे मात्र नक्की. 
'मेड फॉर इच अदर' कपल अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा २४ जानेवारी २०१५ ला रेशीमगाठीत अडकले. त्यांच्या लग्नाला आता पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. अमृता ही मराठी आणि हिमांशू हा पंजाबी असल्यामुळे 'पंजाबी-मराठी' अशा दोन्ही पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला होता. यांच्या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. नववधुच्या वेषात सजलेली अमृता लग्नात अतिशय सुंदर दिसत होती.
अमृता आणि हिमांशूची 'इंडियाज सिनेस्टार की खोज' सेटवरच या  लव्हस्टोरी सुरू झाली होती. ओळख झाल्यापासूनच या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. जवळपास १० वर्षे दोघेही एकमेकांना डेट करत होते. दोघांचीही चांगली केमिस्ट्री जमली होती. १० वर्ष डेट केल्यानंतर दोघांनीही विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. अमृताचा पती हिमांशू मल्होत्रा हा हिंदी मालिकांमध्ये काम करतो तर अमृता आज मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आहे. इंडस्ट्रीत अमृता आणि हिमांशू यांच्याकडे परफेक्ट कपल म्हणून पाहिले जाते.