म्हणून उर्मिला कानेटकर कोठारेचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2017 15:10 IST
उर्मिलाच्या या व्हिडीओमधून आज इंटरनेट, मोबाईल आणि आयफोनच्या जमान्यातही उर्मिलासारख्या शिष्यांनी गुरु-शिष्य नात्याची परंपरा कायम जपली असल्याची प्रचिती येते.
म्हणून उर्मिला कानेटकर कोठारेचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल
जीवनात गुरुचं महत्वाचं स्थान आहे... गुरुशिवाय जीवनात अर्थ नाही.. आपल्या प्रत्येक यशाच्या टप्प्यावर गुरुचा सिंहाचा वाटा असतो त्यामुळे उर्मिला कानेटकर कोठारेने गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी गमावली नाही... क्लासिकल नृत्य करत उर्मिलाने तिचे गुरू आशा जोगळेकर आणि अर्चना जोगळेकर यांना आपल्या नृत्याने गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने मानवंदना वाहिली आहे. उर्मिलाच्या या व्हिडीओमधून आज इंटरनेट, मोबाईल आणि आयफोनच्या जमान्यातही उर्मिलासारख्या शिष्यांनी गुरु-शिष्य नात्याची परंपरा कायम जपली असल्याची प्रचिती येते. उर्मिला अभिनयासबोतच 'नृत्य आशा' डान्स संस्थेमार्फत अनेक विद्यार्थांना नृत्याचे धडे देतेय... कधी विद्यार्थी असलेली उर्मिला आज गुरु बनलीय.. आशा जोगळेकर गुरूंच्या नावाने मी ही इन्स्टिट्युट सुरू केलीय. मी 20-25 वर्षं त्यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवलेत. माझ्या आयुष्यात त्यांचे खूप महत्त्व आहे. कला तुम्ही जोपासली तर ती तुमच्याकडे राहाते असे त्या नेहमी म्हणत असत. त्यामुळे माझी ही कला जोपासण्यासाठी आणि ती अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे इन्स्टिट्युट सुरू केले. मी मुंबईच्या बाहेर असल्यास मला वेळ देणे शक्य नसते. मात्र मी मुंबईत असल्यास स्वतः क्लासमध्ये हजर राहून विद्यार्थ्यांना कथ्थकचे धडे देत असल्याचे उर्मिलाने सिएनएक्स मस्तीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा या उक्तीप्रमाणे उर्मिला आता आपल्या संस्थेच्या माध्यमातून अनेक शिष्यांना नृत्याचे धडे देतेय.नुकतेच उर्मिलाने 'आवाज' या सीरिजमधील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या मालिकेत अहिल्याबाई होळकर ही भूमिका साकारली होती.