Join us

आला रे आला परशाचा नवा लूक आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2017 13:20 IST

महेश मांजरेकर यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित एफ.यू  या सिनेमातील अभिनेता आकाश ठोसरचा लूक रसिकांसमोर आलाय. यांत आकाशचा अंदाज एकदम ...

महेश मांजरेकर यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित एफ.यू  या सिनेमातील अभिनेता आकाश ठोसरचा लूक रसिकांसमोर आलाय. यांत आकाशचा अंदाज एकदम स्टायलिश असल्याचे पाहायला मिळत आहे. आकाशच्या हातात फॅशनेबल लेदरचे ब्रेसलेट पाहायला मिळत आहे. आकाशने यांत लेदर जॅकेट परिधान केले आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा खास मित्र आणि बॉलिवूडचा दबंग सलमान खान याने आकाश ठोसरच्या या लूकचे ट्विट केले आहे. काही दिवसांपूर्वीच सलमानने एफ यू या सिनेमाचे टीजर पोस्टर रिलीज केले होते. आकाश ठोसरला 14 एप्रिलला भेटा असे ट्विटही त्याने यावेळी केले होते. त्यानुसार आकाश ठोसरचा एफयू सिनेमातील लूक आता रिव्हिल झाला आहे. महेश मांजरेकर यांचा हा सिनेमा 2 जूनला रिलीज होणार आहे. यावेळी आकाश ठोसरचा अनोखा अंदाज रसिकांना अनुभवण्यास मिळणार आहे. सिनेमाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना आपल्या पहिल्याच सैराट या सिनेमातून आकाश ठोसरने रसिकांची मने जिंकली आहेत. सैराटमध्ये आकाशने साकारलेला परशा रसिकांवर जादू करुन गेला. परशा आणि आर्ची यांची केमिस्ट्रीसुद्धा रसिकांना चांगलीच भावली. त्यामुळे सैराटला  बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या झिंगाट यशानंतर आकाशचा आगामी सिनेमा कोणता असेल याची रसिकांना उत्सुकता होती. सैराटमधील परशाच्या भूमिकेमुळे लगेचच आकाशला महेश मांजरेकर यांच्या एफ यू या सिनेमाची लॉटरी लागली. आकाश एफयू सिनेमात काम करतो याची कुणकुण लागल्यापासूनच त्याच्या सिनेमातील भूमिका आणि लूकविषयी तर्कवितर्क वर्तवण्यात येत होते. अखेरीस आता आकाशचा एफयू सिनेमातील लूक रसिकांच्या भेटीला आला असून आता रसिकांना या सिनेमाची प्रतीक्षा नक्कीच लागली असेल.