प्रयागराजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभात सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावत पवित्र स्नान केले आहे. महाकुंभापर्यंत पोहोचलेलेल्या कलाकारांच्या यादीत मराठमोळ्या स्वप्निल जोशी(Swapnil Joshi)चाही समावेश झाला आहे. अलिकडेच अभिनेता स्वप्निल जोशी महाकुंभमध्ये सहभागी झाला होता. तिथला व्हिडीओ शेअर करत त्याने त्याचा महाकुंभमधील अनुभवदेखील चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
अभिनेता स्वप्निल जोशीने इंस्टाग्रामवर महाकुंभमधील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो पवित्र स्नान करतानाही दिसत आहे. त्याने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, महाकुंभ २०२५ … आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय अनुभव! प्रयागराजमध्ये महाकुंभ २०२५ ला उपस्थित राहण्याचा आणि महासंगमात पवित्र स्नान करण्याचा योग आला. हा दिव्य प्रवास अनुभवण्याचे भाग्य लाभले, यासाठी माझ्या भावाला सौरभ गाडगील आणि त्यांच्या परिवाराला धन्यवाद! कुटुंब आणि प्रियजनांसाठी प्रार्थना केली, सकारात्मक ऊर्जा आत्मसात केली, डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले!
त्याने पुढे म्हटले की, या अद्भुत महाकुंभाचे साक्षीदार होण्याचा सन्मान मिळणं, हा दैवी आशीर्वाद वाटतो—हा सनातन धर्म, मानवता, प्रेम आणि भक्तीचा सर्वात मोठा उत्सव! या क्षणाची अनुभूती शब्दांत मांडता येणार नाही—खरंच दिव्य अनुभव! हर हर गंगे! नमामि गंगे! जय हिंद! जय भारत!
वर्कफ्रंटस्वप्निल जोशी हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केलेल्या स्वप्निलने हिंदी कलाविश्वदेखील गाजवलं आहे. नुकताच त्याचा जिलबी हा सिनेमा प्रदर्शित झाला. याआधी तो नवरा माझा नवसाचा २ या सिनेमात झळकला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. येत्या काही दिवसात त्याचे आणखी काही नवीन सिनेमे भेटीला येणार आहेत.