Join us
Daily Top 2Weekly Top 5

"गेले २ महिने माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी प्रचंड अवघड होते", अमृता खानविलकरने सांगितला तो प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 10:11 IST

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरने नुकतीच एक भावनिक सोशल मीडिया पोस्ट शेयर केली आहे आणि तिच्या चाहत्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकर(Amruta Khanvilkar)ने कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारून तिच्या फॅशन स्टेटमेंटने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. अमृताने नुकतीच एक भावनिक सोशल मीडिया पोस्ट शेयर केली आहे आणि तिच्या चाहत्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. 

अमृता खानविलकरने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, गुरु म्हणजे पाठीशी उभा राहणार, गुरु म्हणजे वाट दाखवणारा, आपल्या वर येणारं संकट झेलण्याची ताकत देणारा आणि हे सगळं….. न मागता देणारा म्हणजे गुरु. गेले दोन महिने माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी प्रचंड अवघड होते ... माझी आई हिची ५ तारखेला ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली.... तिला कुठल्याही  प्रकारचा अटॅक किंव्हा कसला ही जीवघेणा त्रास झाला नाही... मम्माची कंडिशन आम्हाला डिटेक्ट करता आली आणि त्यावर योग्य तो उपचार करता आला ह्यात फक्त आणि फक्त स्वामींची कृपा होती.

ती पुढे म्हणाली की, मला मनापासून धन्यवाद म्हणायचे आहेत ते म्हणजे एशियन हार्ट इन्स्टिट्युट बीकेसी ह्यांचे.... पद्मश्री @drpandaasianheart ज्यांनी सर्जरी (सर तुम्हाला देवाने पाठवले होते).... डिसिल्वा सर... वंजारे सर... आयसीयुच्या सिस्टर्स जनरल वॉर्डच्या सिस्टर्स.... डॉ रोशन.... डॉक्टर इमरान आणि तिथल्या संपूर्ण स्टाफचे मनापासून धन्यवाद.

''तुम्ही माझे देवदूत आहात आणि..''

अमृताने पोस्टमध्ये लिहिले की, जीवनाला हादरवून टाकणाऱ्या अशा अचानक घडलेल्या घटनांमध्ये आपल्याला विश्वास सापडतो आणि माझेही असेच झाले. मी माझ्या सर्व मित्रांचे आणि कुटुंबाचे आभार मानू इच्छिते ज्यांनी सावलीप्रमाणे माझी साथ दिली, मला मिठी मारली, मला भरवले, मला सांभाळले... तुम्ही माझे देवदूत आहात आणि तुम्हा सर्वांना माहीत आहे की, माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. 'आई आता बरी होत आहे आणि प्रत्येक स्त्री आयरन लेडी आहे हे खऱ्या अर्थाने दाखवून दिले. श्री स्वामी समर्थ. मम्मा माझे तुझ्यावर प्रेम आहे"

अमृताने दिला मोलाचा सल्ला

इथेच न थांबता प्रेक्षकांना एक मोलाचा आणि महत्त्वपूर्ण सल्ला देताना ती म्हणते, "शेवटी सर्वांना असे आवाहन केले की 'ही घटना घडल्यानंतर सर्व मुलं आणि पालकांना सांगू इच्छिते की, कृपया तुमच्या कुटुंबातील कोणालाही किंवा त्यांच्या आरोग्याला गृहीत धरू नका, ३ वर्षांपूर्वी मी माझ्या अशाच एका महत्त्वाच्या व्यक्तीला गमावले होते. माझ्या आईला कधी अर्धा दिवसही रुग्णालयात दाखल केले नव्हते, तिला आतापर्यंत कोणतीही आरोग्य समस्या आली नव्हती आणि तिची एवढी मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे कृपया नियमित तपासणी करून घ्या, कृपया आरोग्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. देव तुम्हा सर्वांचे कल्याण करो."

टॅग्स :अमृता खानविलकर