Join us

श्रुती मराठे नव्हे तर 'या' नावने साऊथमध्ये ओळखली जाते अभिनेत्री, जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 08:00 IST

मराठीत श्रुती मराठे म्हणून  प्रसिद्ध असेलली अभिनेत्री साऊथमध्ये वेगळ्याच नावाने ओळखली जाते.

दमदार अभिनयशैली आणि सौंदर्या यांच्या जोरावर श्रुतीने मराठी कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. श्रुतीने आजवरच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. यात तिचा सनई चौघडे हा सिनेमा चांगला गाजला. दरम्यान  श्रुतीने निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलं आहे.  झी मराठीवरील 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेची निर्माती  श्रुती आहे. 

सोशल मीडियावर श्रुतीचा मोठा चाहता वर्ग आहे. श्रुती आपल्या पर्सनल आणि प्रोफोशनल दोनही बद्दलची माहिती चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. पण तुम्हाला माहिती आहे का मराठीत श्रुती मराठे म्हणून  प्रसिद्ध असेलली अभिनेत्री साऊथमध्ये वेगळ्याच नावाने ओळखली जाते. होय, श्रुतीने मराठीसोबत साऊथमध्ये काही काम केलं आहे.  श्रुतीने  तमिळ चित्रपटात काम केले आहे.  

 मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकणारी श्रुती तिकडे 'श्रुती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे. तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'मध्ये ती झळकली होती.  मराठीसह श्रुतीने तमिळमध्ये ४ आणि कन्नडमध्ये १ सिनेमा केला आहे. 

दरम्यान , श्रुतीने मुंबई पुणे मुंबई २, बंध नायलॉनचे, सनईचौघडे, रमा माधव या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर, राधा ही बावरी ही तिची मालिका विशेष गाजली. या मालिकेमधूनच तिची मराठी कलाविश्वात खरी ओळख निर्माण झाली. मराठीसह श्रुतीने तमिळमध्ये ४ आणि कन्नडमध्ये १ सिनेमा केला आहे. श्रुती एक उत्तम डान्सर आहे. तसंच तिने कराटेचंही प्रशिक्षण घेतलं आहे.श्रुती एक उत्तम डान्सर आहे. तसंच तिने कराटेचंही प्रशिक्षण घेतलं आहे. 

टॅग्स :श्रुती मराठे