Join us  

म्हणून संजय जाधव यांचा 'लकी' सिनेमा होतोय एकदिवस आधी रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 8:00 AM

संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 ला संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.

ठळक मुद्देव्हॅलेंटाईन्स डेच्या आठवड्याची सुरूवात 7 फेब्रुवारीपासून होतेय‘रोज डे’ पासून ते ‘व्हॅलेंटाईन्स डे’ पर्यंत कॉलेजमधल्या प्रेमाचा आलेख उंचावत जातो

बी लाइव्ह प्रॉडक्शन्स प्रस्तूत ड्रिमींग ट्वेंटी फोर सेवन निर्मित संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपट उद्या 7 फेब्रुवारीला रिलीज होतोय. सर्वसाधारणपणे चित्रपट शुक्रवारी रिलीज होतात. मात्र 'लकी' गुरूवारी रिलीज होतोय. सिनेमाच्या विषयात आणि प्रमोशनल स्ट्रॅटेजीमध्ये हटकेपणाचे सातत्य ठेवलेल्या लकी सिनेमाने रिलीजचा दिवसही हटकेच निवडलेला दिसतोय.

7 फेब्रुवारीलाच सिनेमा रिलीज का होतोय, हे सांगताना दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, “व्हॅलेंटाईन्स डेच्या आठवड्याची सुरूवात 7 फेब्रुवारीपासून होतेय. ‘रोज डे’ पासून ते ‘व्हॅलेंटाईन्स डे’ पर्यंत कॉलेजमधल्या प्रेमाचा आलेख उंचावत जातो. ह्यामध्ये कोणी ठरतो लकी तर कोणाचे ‘ल..’ लागतात. म्हणूनच उत्कट प्रेमाची सुरूवात होणा-या दिवशी 7 फेब्रुवारीला लकी रिलीज होतोय.”   

ह्याविषयी चित्रपटाचे निर्माते सुरज सिंग म्हणतात, “दादांनी मराठी सिनेसृष्टीत अनेक पायंडे पाडलेत. लकीच्याबाबतही कथेच्या नाविन्यापासून ते हिरो-हिरोइनच्या निवडीपर्यंत आणि अगदी प्रमोशनल स्टॅटेजीपर्यंत ‘लकी’च्या बाबतीत सगळंच हटके झाल्याचं तुम्हांला दिसतंय. आमची रिलीज डेटही हटके आहे. प्रेमाच्या स्वप्नमयी लकी दिवसांची सुरूवात आता 7 फेब्रुवारी पासून होते आहे.”

लकी सिनेमाचा ‘हिरो’ अभय महाजन म्हणतो, “रोज डेच्या दिवशी अनेक कॉलेज तरूणांच्या मनात जी हूरहूर चालू असेल. तिच हूरहूर तुम्हांला 7 फेब्रुवारीला सिनेमगृहात दिसणा-या ‘लकी’च्या मनातही चाललेली दिसेल. लव्हस्टोरीमध्ये 7 हा आकडा खूप महत्वाचा असतो. कॉलेजच्या प्रेमातले तर 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी हे ‘वो सात दिन’ महत्वाचे असतातच. पण नव्या-नव्या प्रेमात तर ‘ती’ 7 जन्माची साथीदारीणच असल्यासारखी वाटते. त्यामूळेच लकी-जियाची ‘साथ’ 7 फेब्रुवारीपासूनच चालू होणे, सहाजिक आहे.”

अभिनेत्री दिप्ती सती म्हणते, “संजयदादा हे मराठीतले ट्रेंडसेटर आहेत. जशी सलमान खानची फिल्म रिलीज होणे, हा बॉलीवूडमध्ये एक सण असतो. तसाच मराठी फिल्म इंडस्ट्रीत संजयदादांची फिल्म रिलीज होणे, हा ही एक सणच मानला जातो, हे मला माहित आहे. त्यामूळे आता कदाचित दादांनी गुरूवारी फिल्म रिलीज केल्यावर यापूढे बाकी फिल्ममेकरही गुरूवारीच फिल्न रिलीज करतील.”

 'बी लाइव्ह प्रोडक्शन्स' आणि 'ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन' निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 ला संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.

टॅग्स :लकीसंजय जाधव