देऊळ बंद - २... आता परिक्षा देवाची., लवकरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 14:29 IST
देऊळ बंदच्या घवघवीत यशानंतर आता दिग्दर्शक प्रविण तरडे देऊळ बंद-२ घेऊन येत आहेत. ...
देऊळ बंद - २... आता परिक्षा देवाची., लवकरच
देऊळ बंदच्या घवघवीत यशानंतर आता दिग्दर्शक प्रविण तरडे देऊळ बंद-२ घेऊन येत आहेत. आध्यात्मर आधारलेल्या देऊळ बंद या चित्रपटामध्ये निर्माते कैलास वाणी यांना अंद्धश्रदंधेच्या पोटात लाथ मारायची होती असे प्रविण तरडे यांनी सीएनएक्सशी बोलताना सांगितले. आता याच चित्रपटाच्या पुढील भागात आध्यात्म अन शेतकरी यांची सांगड घालण्यता आली आहे. सध्या दुष्काळाने होरपळत असलेला महाराष्ट्र अन शेतकºयांच्या आत्महत्या यावर प्रकाश टाकणारा हा सिनेमा आहे. परमेश्वराला शेतकरी म्हणतोय, शेतकºयांना सहानुभूती नकोय, आशीर्वाद पण नकोत ते तर त्यांना राजकारण्यांकडुन पण मिळतात. मग या चित्रपटातील शेतकºयाला पाहिजे ती देवाची साथ आता देवाची साथ कशाला हवी असे वाटत असेल तर हा शेतकरी थेट देवालाच त्याच्या शेतात काम करायला लावतोय. जोपर्यंत देव शेतात काम करणार नाही तोपर्यंत शेतकºयांच्या आत्महत्या थांबणार नाहीत असे तो शेतकरी म्हणतो. मग देव खरच शेतात काम करतो का, आत्महत्या थांबतात का हे या चित्रपटात पाहताना मजा येईल असे प्रविण तरडे यांनी सांगितले. चित्रपटाच्या प्रमुख भुमिकेत आपल्याला शेतकºयांसाठी रिअल लाईफमध्ये झटणारे मकरंद अनासपुरे पहायला मिळतील.