Join us

तेजस्विनीचा डॅशिंग अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2016 14:46 IST

मराठी इंडस्ट्रीमध्ये बाईक रायडिंग करणाºया अभिनेत्रींची संख्या फार दुर्मिळच आहे. बाईक रायडिंग करणाºया या अभिनेत्री अभिनयाबरोबर त्यांच्या या स्पोर्टी ...

मराठी इंडस्ट्रीमध्ये बाईक रायडिंग करणाºया अभिनेत्रींची संख्या फार दुर्मिळच आहे. बाईक रायडिंग करणाºया या अभिनेत्री अभिनयाबरोबर त्यांच्या या स्पोर्टी लूकने मनावर राज्य करतात. आता हेच बघा ना, अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने देखील बाईक रायडिंग लूकमधील एकदम झक्कास फोटो सोशलमिडीयावर अपलोड केला आहे. या फोटोमध्ये ती खूपच बिनधास्त व बोल्ड दिसत आहे. तेजस्विनी ही बाईकजवळ डॅशिग अंदाजात उभी राहलेली दिसत आहे. डोळयावर काळा गॉगल व बाइक रायडिंगवाल्या लूकमध्ये स्यायलिश वाटत आहे. पण तिने हे फोटोशुट केले आहे की खरचं बाइक रायडिंग केले आहे. हे अदयाप कळाले नाही. पण फोटो मात्र झक्कास आहे.  तेजस्विनी  काही दिवसांपूर्वी बर्नी या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिने खूप सोज्वळ भूमिका साकारली होती. त्या तुलनेत तिचा हा लूक एकदमच हटके आहे. तिचा हा ग्लॅमरस फोटो पाहून तिचे चाहते अवाक होतील हे मात्र नक्की.