तेजस्विनीचा बचपणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 13:40 IST
लहानपणा हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाच्या मनात एक विचार येतोच की, का मी मोठे झाले, ...
तेजस्विनीचा बचपणा
लहानपणा हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाच्या मनात एक विचार येतोच की, का मी मोठे झाले, लहान होते तेच छान होते. पण किती ही मोठे झालो तरी लहानपणीचे किडेगिरी समोर दिसली की, ती किडेगिरी करण्याचा मोह देखील आवरत नाही. असेच काहीसे अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या बाबतीत घडलेले दिसते. गुलाबाची कळी, कॉमेडीची बुलेट ट्रेन असणारी तेजस्विनी चक्क प्लास्टिक चे फुगे फोडत बसली आहे. तिचे हे लहानपण पाहून प्रत्येकाला आपल्या बालपणाची आठवण झाली असणार हे खरं. तेजस्विनीनेने नुकतेच प्लास्टिकचे फुगे फोडतानाचा एक क्लिक सोशलमिडीयावर शेअर केला आहे. या क्लिकमध्ये तिने तर संपूर्ण पॅकिंग असलेली प्लास्टिक रॅप डोक्यावर पदर सारखेओढून मस्त एन्जॉय करत ती प्लास्टिकचे फुगे फोडत आहे. गुलाबाच्या कळीचा हा क्लिक पाहता, प्रत्येकजण आपल्या बालपणीच्या आठवणीत रमले असतील हे नक्की.