Join us
Daily Top 2Weekly Top 5

तेजस्विनी पंडितने राज ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली, 'हसत राहा...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 18:42 IST

राज ठाकरेंबद्दल तेजस्विनी काय म्हणाली?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा आज वाढदिवस. चाहते, कलाकार, नेते मंडळी आणि नागरिकांकडून आज त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. तसंच राज ठाकरे कलाप्रेमी, साहित्यप्रेमीही आहेत हे सर्वांनाच माहित आहे. इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांच्या पाठीशी ते कायम उभे असतात. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने राज ठाकरेंसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

काय आहे तेजस्विनीची पोस्ट?

राजसाहेब, हेवा वाटतो तुमचा, तुमच्या मराठी आणि महाराष्ट्रवरच्या प्रेमाचा.इतका निस्वार्थी भावना असणारा, आणि इतरांसाठी जगणारा माणूस क्वचितच सापडतो आता !साहेब तुमच्या राजकारणाविषयी , तुम्ही घेतलेल्या भूमिकेंविषयी लोकांचं काय म्हणणं आहे याच्याशी मला काही घेणंदेण पण नाही ,किंबहुना “तुम्हाला जाणलेल्या” कुठल्याच व्यक्तीच्या मनातलं प्रेम त्यामुळे तसूभरही कमी होऊ शकत नाही, हेच तुम्ही कमावलं आहे.तुम्ही तुमच्या ध्यासाच्या आणि स्वप्नाच्या दिशेने चालत रहा !आमचा तुम्हाला आणि तुमच्या विचारांना बिनशर्त पाठिंबा आहे 🙏🏼

मनासारखा राजा आणि राजासारखं मन !हसत रहा साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

मराठी इंडस्ट्रीतील इतरही कलाकारांनी राज ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या राज ठाकरे राजकारणात पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. लोकसभा निवडणूकीत त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला. तर आता आगामी विधानसभा निवडणूकीत मनसेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.

टॅग्स :तेजस्विनी पंडितराज ठाकरेसोशल मीडियामराठी अभिनेतामनसे