Join us

अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने शेअर केलेल्या फोटोने वेधलं लक्ष; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 13:52 IST

तेजस्विनीने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित  (Tejaswini Pandit). उत्तम अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. तेजस्विनी तिच्या अभिनयासह बेधडक वक्तव्य आणि स्पष्टवक्तेपणामुळेही कायम चर्चेत असते. अभिनयाबरोबर सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडणाऱ्या तेजस्विनीचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे.  ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तेजस्विनीने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

काही दिवसांपुर्वीच तेजस्विनीने ती मावशी झाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. तेजस्विनीची बहिण पौर्णिमा पुल्लन हिने दिवाळीत मुलीला जन्म दिलाय. आता तिने आपल्या बहिणीच्या मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. "Here comes the Sun !! My New Forever...What a feeling", असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं.  या फोटोत चिमुकल्या बाळाची झलक दिसतेय. तेजस्विनी पंडीतच्या या पोस्टवर चाहत्यांसोबत कलाकार अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. 

तेजस्विनी पंडितच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिने अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही प्रवेश केला आहे.  अलिकडेच तिचा 'येक नंबर' हा चित्रपट प्रदर्शित झाला. तेजस्विनी पंडितने केदार शिंदेच्या बहुचर्चित 'अगं बाई अरेच्चा' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. तिने आतापर्यंत अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांसह मालिकांमध्येही ती झळकली.  सध्या तेजस्विनी एकटी असून ती निर्माती म्हणूनही नाव कमावत आहे.

टॅग्स :तेजस्विनी पंडितसेलिब्रिटी