Join us
Daily Top 2Weekly Top 5

नथीचा नखरा म्हणत तेजस्विनी पंडितने खणाच्या साडीत केलं फोटोशूट, दिसतेय खूपच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 19:00 IST

आपल्या अभिनयाची जादू तेजस्विनीने दाखवली आहे.

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने रसिकांवर मोहिनी घातली आहे. तेजस्विनीच्या अदा आणि स्टाईलवर चाहते फिदा होत असतात.. मराठीत आपल्या अभिनयाची जादू तेजस्विनीने दाखवली आहे.तेजस्विनी सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. इन्स्टाग्रामवर तिचे फोटो, व्हिडीओ आणि आगामी प्रोजेक्टची माहिती ती चाहत्यांना देत असते. नुकतेच तेजस्विनी तिच्या इन्स्टाग्रामवर खणाच्या साडीतले फोटो शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. साडीत तेजस्विनीच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. नथीचा नखरा असा या फोटोंना तिने कॅप्शन दिले आहे. चाहत्यांनी तिचे हे फोटोशूट आवडले आहे. त्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमा, विविध नाटकं आणि १०० डेज सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे.

सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.लवकरच तेजस्विनी 'समातंर 'च्या दुसऱ्या सीझनमध्ये झळकणार आहे.

टॅग्स :तेजस्विनी पंडित