Join us
Daily Top 2Weekly Top 5

सरवणकरांची सून झाली तेजस्विनी लोणारी! शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत बांधली लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 15:00 IST

Tejaswini Lonari And Samadhan Sarvankar Wedding :अभिनेत्री तेजस्विनी लोणारी शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विवाहसोहळा संपन्न झाला.

मराठी कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहे. नुकतेच बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणने संजना गोफणेशी लग्न केले. त्यानंतर २ डिसेंबर रोजी प्राजक्ता गायकवाड-शंभुराज खुटवड आणि सोहम बांदेकर-पूजा बिरारी लग्नबेडीत अडकली. त्यानंतर आज म्हणजेच ४ डिसेंबर रोजी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विवाहसोहळा संपन्न झाला. सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे व्हिडीओ पाहायला मिळत आहे.

२६ ऑक्टोबर रोजी शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत तेजस्विनी लोणारीचा साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर आता नुकताच तिच्या मेहंदी आणि हळदी सोहळा पार पडला. याचे खास फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. त्यानंतर आज ते दोघे विवाहबंधनात अडकले आहेत. यावेळी तेजस्विनीने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. वधूच्या गेटअपमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसते आहे. तर समाधान यांनी ऑफव्हाइट रंगाची शेरवानी परिधान केली आहे. 

वर्कफ्रंट

केदार शिंदेंचे भाऊ मंदार शिंदे यांच्या 'नो प्रॉब्लेम' या चित्रपटातून तेजस्विनी लोणारी हिने करिअरची सुरुवात केली होती. तेव्हा नुकतीच तिची दहावी झाली होती. पहिल्याच चित्रपटात तेजस्विनीने जितेंद्र जोशीच्या हिरोइनची भूमिका साकारली होती. अभिनेत्रीसोबतच तेजस्विनी निर्मातीसुद्धा आहे.  'दोघात तिसरा आता सगळा विसरा', 'नो प्रॉब्लेम', 'बाप रे बाप डोक्याला ताप', 'गुलदस्ता' आणि 'बायको नंबर १' आणि बर्नी या सिनेमात तेजस्विनीने काम केले आहे. याशिवाय ती 'तुझेच मी गीत गात आहे', 'देवमाणूस' या मालिकेतही झळकली आहे. तर समाधान सरवणकर हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते सदा सरवणकर यांचे पुत्र आहेत. तेजस्विनी आणि समाधान त्यांनी आज लग्नगाठ बांधून आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tejaswini Lonari weds Samadhan Sarvankar, Shiv Sena leader's son.

Web Summary : Actress Tejaswini Lonari married Shiv Sena leader Samadhan Sarvankar in Mumbai. Following pre-wedding festivities, the couple tied the knot in a lavish ceremony. Lonari, known for films like 'No Problem,' starts a new chapter with Sarvankar.
टॅग्स :सेलिब्रेटी वेडिंग