आपल्या सर्वांना माहित आहे तेजस नेरुरकर सारख्या उत्तम फोटोग्राफरला प्रसिध्द फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. 'जसे गुरु तसा शिष्य' हे तेजसच्या फोटोग्राफीच्या कौशल्यावरुन सिध्द होते.
आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तेजस नेरुरकरची मार्गदर्शक-गुरु गौतम राजाध्यक्ष यांच्याविषयी असलेली भावना जाणून घेऊयात.
“प्रसिध्द फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष सरांच्या मार्गदर्शनाखाली मी फोटोग्राफीचे धडे गिरवले. फोटोग्राफी ही मला सरांमुळेच अगदी सहज सोपी वाटते. त्यांच्यामुळेच मला या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली.”