Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ती आणि इतर':गोविंद निहलानी यांचा पहिला मराठी सिनेमा महिलाप्रधान ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2017 11:13 IST

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक गोविंद निहलानी आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. त्यांच्या पहिल्यावहिल्या मराठी सिनेमाचं पोस्टर जारी ...

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक गोविंद निहलानी आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. त्यांच्या पहिल्यावहिल्या मराठी सिनेमाचं पोस्टर जारी करण्यात आलंय. सोशल मीडियावरुन लॉन्च करण्यात आलेल्या या सिनेमाचं नाव 'ती आणि इतर'. या सिनेमात सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, आविष्कार दार्व्हेकर, भूषण प्रधान, प्रिया मराठे, सुमन पटेल या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.'ती आणि इतर' या सिनेमाची टॅगलाईनही तितकीच लक्षवेधी आहे. सायलेन्स इज नॉट ऍन ऑप्शन म्हणजेच शांत बसणं हा काही पर्याय नाही. या टॅगलाईनवरुन या सिनेमाचा विषय आक्रमक असून कथा रोमांचक असल्याचं वाटत आहे. तसंच पोस्टरवरुन या सिनेमातून महिलांच्या विषयाला हात घातल्याचंही बोललं जात आहे. गोविंद निहलानी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. दर्जेदार सिनेमांची निर्मिती ही निहलानी यांची खासियत राहिली आहे. त्यांच्या अनेक सिनेमांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. जुनून, आक्रोश, अर्धसत्य, दृष्टी, अशा अनेक आशयघन सिनेमांचं दिग्दर्शन निहलानी यांनी केले आहे. सोनाली कुलकर्णीने सीएनएक्समस्तीला दिलेल्या मुलाखती सांगितले की,मी या सिनेमाचा भाग होऊ शकले याचा मला आनंद आहे. गोविंदजी कॅमेरामन असताना त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करायला मिळाल्यामुळे हा अनुभव नेहमीच माझ्या कामी येणार आहे.माझ्या करिअरच्या दृष्टीने हा सिनेमा टर्निंग पॉईंट असणार आहे.या सिनेमाच्या नित्ताने रसिकांना एक उत्तम कलाकृती पाहिल्याचा आनंद होईल अशी मला खात्री वाटते. तर सुबोध भावेने सांगितले की, मी आजवर केलेल्या सिनेमांमुळेच मला हा सिनेमा मिळाला 'बालगंधर्व', 'कट्यार काळजात घुसली', 'लोकमान्य एक युगपुरुष' या सिनेमांमुळे गोविंदजींनी या सिनेमासाठी माझी निवड केली त्यामुळे माझ्या इतर सिनेमांच्या कामाचा अनुभव या सिनेमावेळी कामी आला. गोविंद निहलानी यांच्या पहिल्या सिनेमात काम करण्याचा अनुभव एक कलाकार म्हणून समृध्द करणारा ठरला असेच मी सांगेन असे सुबोध भावेने सांगितले.