Join us

'वन वे तिकीट' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 10:14 IST

नवीन चित्रपटाच्या चित्रपट प्रदर्शित होण्याप्रमाणेच प्रेक्षक टीझर प्रदर्शित होण्याचीदेखील वाट पाहत आहे. हाच प्रमोशन फंडा लक्षात घेऊन, नुकतेच वन वे तिकीट या नवीन चित्रपटाचा टिझर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे

हल्ली नवीन चित्रपाटांचे पोस्टर, टीझर, ट्रेलर हे प्रमोशन फडयांची क्रेझ सर्वानाच लागली आहे. एखादा नवी चित्रपट येऊ घातला की, प्रेक्षक सुद्धा विचारतात की, चित्रपटाचे टीझर झाले का प्रदर्शित? त्यामुळे नवीन चित्रपटाच्या चित्रपट प्रदर्शित होण्याप्रमाणेच प्रेक्षक टीझर प्रदर्शित होण्याचीदेखील वाट पाहत आहे. हाच प्रमोशन फंडा लक्षात घेऊन, नुकतेच वन वे तिकीट या नवीन चित्रपटाचा टिझर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. अमोल शेटगे दिग्दर्शित वन वे तिकीट हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत क्रूझवर चित्रित करण्यात येणारा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण इटली, स्पेन आणि फ्रान्स या ठिकाणी नुकतेच पूर्ण झाले आहे. टिझरच्या माध्यामातून या चित्रपटाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. 'सस्पेन्स थ्रिलर असणाºया या चित्रपटाचे कथानक पाच व्यक्ती आणि त्यांचा क्रुझवरचा प्रवास यावर आधारित आहे. तसेच या चित्रपटात अमृता खानविलकर, नेहा महाजन,सचित पाटील, गश्मीर महाजनी आणि शशांक केतकर या  स्टार कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट १० जूनला प्रदर्शित होणार आहे.