Join us
Daily Top 2Weekly Top 5

चहात्याचे प्रेम चक्क रांगोळीतून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 10:40 IST

 कलाकारांसाठी असलेले प्रेम चाहते चक्क कशातून व्यक्त करता येईल हे सांगता येत नाही बुवा. माधुरी, अमिताभ यांचे चाहते वाढदिवशी ...

 कलाकारांसाठी असलेले प्रेम चाहते चक्क कशातून व्यक्त करता येईल हे सांगता येत नाही बुवा. माधुरी, अमिताभ यांचे चाहते वाढदिवशी केकवर त्यांचे फोटो वगैरे टाकून केक कापतात व साजरा देखील करतात. पण वाढदिवस नाही, तसे  कारण ही काही नाही तर या चाहत्याने  मोठे संत म्हणा, व्यक्तीमहत्व म्हणा किवा एखादा बॉलिवुड स्टार व क्रिकेटर ही नाही तर चक्क रांगोळी स्पर्धेत मराठी अभिनेता सुयश टिळकचा चेहरा काढला आहे. काय म्हणाव, या प्रेमाला पण असो प्रेम कोणत्याही प्रकारचे असो, पण तुमचं आमचं सेम असतं अशाच काही या भावना हा चाहता रांगोळीतून व्यक्त करत असेल. ही रांगोळी स्पर्धा दैवज्ञ या समाजाने दादर या ठिकाणी भरविण्याण्यात आली होते.  या चाहत्याचे नाव राजन वैदय असे आहे. पण चाहत्याचे हे प्रेम पाहता, सुयश टिळकने लगेच आपल्या या फॅन्सची दखल देखील घेतली, सुयशने टिविट केले की, धन्यवाद राजन,माझा एवढा छान फोटो रांगोळीतून तयार केल्याबद्दल. खरंच, चाहते व कलाकार याचे एक अनोखे नाते यावेळी पाहायला मिळाले.