Join us

‘मोगरा फुलला’मधील स्वप्नील जोशीचा हटके लूक तुम्ही पाहिलात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 14:12 IST

अभिनेता स्वप्नील जोशी चित्रपटांच्या बाबतीत बराच चोखंदळ झालाय. ‘चॉकलेट बॉय’, ‘रोमॅन्टिक हिरो’ची आपली ओळख पुसून काढत नव नव्या भूमिकांकडे त्याचा वाढलेला कल पाहता तरी, हेच दिसतय.

ठळक मुद्दे ‘मोगरा फुलला’ हा चित्रपट मुळात एक प्रेमकथा आहे. स्वप्नीलने यात एका मध्यमवर्गीय तरूणाची भूमिका साकारली आहे.

अभिनेता स्वप्नील जोशी चित्रपटांच्या बाबतीत बराच चोखंदळ झालाय. ‘चॉकलेट बॉय’, ‘रोमॅन्टिक हिरो’ची आपली ओळख पुसून काढत नव नव्या भूमिकांकडे त्याचा वाढलेला कल पाहता तरी, हेच दिसतय. लवकरच स्वप्नील एका हटके अंदाजात प्रेक्षकांपुढे येणार आहे. होय, सरकारनामा, लपंडाव  अशा रसिकप्रिय चित्रपटाची दिग्दर्शिका श्रावणी देवधरच्या ‘मोगरा फुलला’ या आगामी मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले असून यात स्वप्नील जोशी अगदी वेगळ्याच लूकमध्ये दिसणार आहे. सुनील कुलकर्णी असे त्याच्या व्यक्तीरेखेचे नाव आहे. या चित्रपटाची निर्मिती अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशानदार करीत आहेत.

ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ‘मोगरा फुलला’मधील स्वप्नीलच्या नव्या लूकचा फोटो शेअर केला आहे. ‘मोगरा फुलला’ हा चित्रपट मुळात एक प्रेमकथा आहे. स्वप्नीलने यात एका मध्यमवर्गीय तरूणाची भूमिका साकारली आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला आणि कौटुंबिक जबाबदाºयांमध्ये अडकून पडलेल्या सुनील कुलकर्णीचे (स्वप्नील साकारत असलेले पात्र) लग्नाचे वय कधीच उलटून जाते. पण एका वळणावर अचानक आपण प्रेमात पडल्याची जाणीव त्याला होतो. एका सधन कुटुंबातील स्वतंत्र विचारांच्या मुलीच्या प्रेमात तो पडतो, असे या चित्रपटाचे ढोबळ कथानक आहे.

टॅग्स :स्वप्निल जोशी