Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनप्रवास उलगडणार 'स्वातंत्र्यवीर' लघुपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 16:36 IST

 'स्वातंत्र्यवीर' या वेब सीरिजचे दिग्दर्शन प्रवीण राजा कारळे यांनी केले असून निर्मिती प्रशांत दळवी व पराग पाटील यांनी केली आहे. यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका अभिनेता सौरभ गोखले ह्याने केली आहे आणि यात सावरकर यांच्या बालपणीच्या काळातील त्यांच्या गुरूजीच्या भूमिकेत अभिनेते यतिन कार्येकर दिसणार आहेत. 

ठळक मुद्देस्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत सौरभ गोखले

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जीवनप्रवास आता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. त्यांच्या जीवनावर आधारीत लघुपट नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 'स्वातंत्र्यवीर' असे या लघुपटाचे नाव आहे. हा लघुपट प्रेक्षकांना युट्युबवर पाहता येणार आहे.

 'स्वातंत्र्यवीर' या लघुपटाचे दिग्दर्शन प्रवीण राजा कारळे यांनी केले असून निर्मिती प्रशांत दळवी व पराग पाटील यांनी केली आहे. यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका अभिनेता सौरभ गोखले ह्याने केली आहे आणि यात सावरकर यांच्या बालपणीच्या काळातील त्यांच्या गुरूजीच्या भूमिकेत अभिनेते यतिन कार्येकर दिसणार आहेत. 

टीव्ही मालिकांपेक्षा चित्रपट, जाहिराती, लघुपट व वेब सीरिज करण्याला जास्त प्राधान्य असल्याचे यतिन कार्येकर म्हणाले व त्यांनी पुढे सांगितले की, 'या माध्यमात काम करण्यासाठी खूप स्वातंत्र्य आहे. तसेच या सीरिजची स्क्रीप्ट आधीच मिळत असल्यामुळे ती भूमिका चांगल्यापद्धतीने साकारायला मदत होते. डिजिटल माध्यम जगभरात पोहचते. त्यामुळे हे खूप चांगले माध्यम आहे. '

'स्वातंत्र्यवीर' या लघुपटाबद्दल यतिन कार्येकर यांनी सांगितले की, 'स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल लोकांना या लघुपटातून जाणून घेता येणार आहे. यामध्ये सावरकर यांच्या बालपणीच्या काळात शाळेतील गुरूजी भूमिका मी केली आहे. ही वेबसीरिजदेखील प्रेक्षकांना आवडेल अशी आशा आहे.'

'स्वातंत्र्यवीर' या लघुपटात यतिन कार्येकर यांच्यासह सौरभ गोखले, प्रियांका यादव, किरण कुलकर्णी व शरद पोंक्षे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. 

टॅग्स :सौरभ गोखले