लव्हर बॉयकडून बेस्ट फ्रेंडकडे स्वप्नीलचा मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 15:05 IST
काहीसा 'दुनियादारी' सोडला तर स्वप्निल जोशीने सगळेच रोमँटिक चित्रपट केले असल्याने 'लव्हर बॉय' अशी त्याची इमेज चित्रपटसृष्टीमध्ये निर्माण झाली ...
लव्हर बॉयकडून बेस्ट फ्रेंडकडे स्वप्नीलचा मोर्चा
काहीसा 'दुनियादारी' सोडला तर स्वप्निल जोशीने सगळेच रोमँटिक चित्रपट केले असल्याने 'लव्हर बॉय' अशी त्याची इमेज चित्रपटसृष्टीमध्ये निर्माण झाली आहे. पण आगामी 'फ्रेंड्स' चित्रपटात हा लव्हर बॉय बेस्ट फ्रेंडमध्ये परावर्तीत झाला आहे.'शोले' मधल्या जय-वीरूसारखी स्वप्निल आणि सचेत पाटीलची जोडीदेखील मराठी पडद्यावर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाली आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, सोशल नेटवर्किंग साईटवर नेटिझन्सची त्याला पसंतीदेखील मिळत आहे. 'नील' च्या भूमिकेमध्ये स्वप्निलचे दर्शन घडणार असून, स्वत:च्या तत्त्वांवर जीवन जगणारा नील मैत्रीसाठी तत्त्वांना मुरड घालणार का? हे केवळ काळच सांगू शकणार आहे. सचेतची व्यक्तिरेखा अद्याप गुलदस्तातच आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन आर. मधेश यांचे आहे. या दोघांशिवाय गौरी नलावडे, नेहा महाजन आणि सागर कारंडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.