Join us

स्वप्निल-सुबोधच्या मैत्रीत कोणी पाडली दरार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 17:02 IST

      आगामी 'फुगे' या सिनेमाची सध्या मोठी चर्चा होत आहे. दोन जिवलग मित्रांची रंगीत दुनिया मांडणारा हा ...

      आगामी 'फुगे' या सिनेमाची सध्या मोठी चर्चा होत आहे. दोन जिवलग मित्रांची रंगीत दुनिया मांडणारा हा सिनेमा रसिकांचे भरघोस मनोरंजन करणारा ठरणार आहे. स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांच्या प्रेमाची बेकस्टोरी सांगणाऱ्या या सिनेमाची नायिका कोण? या प्रश्नाला अखेर पूर्णविराम मिळाला. प्रार्थना बेहरेची नायिकेच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे. नेहमीच आपल्या प्रियकराला आपल्या मर्जीत ठेऊ इच्छिणाऱ्या आणि सतत डॉमिनेट करणाऱ्या टिपिकल गर्लफ्रेंडच्या भूमिकेत प्रार्थना दिसणार आहे. यात तिची 'जाई हर्डीकर' नावाची व्यक्तिरेखा साकारणार  असून, ती स्वप्निलच्या प्रेयसीच्या भूमिकेत लोकांसमोर येणार आहे. आपल्या भावी नवऱ्याचे त्याच्या मित्रासोबतचे असलेले नाते तिला आवडत नाही, अशावेळी कोणत्या ना कोणत्या कारणांनी या दोघांमध्ये नेहमीच आडवी येणारी ही जाई स्वप्नील (आदित्य अग्निहोत्री) आणि सुबोध (ऋषिकेश देशमूख) च्या मैत्रीत कशीमध्ये  येते हे पाहणे मजेशीर ठरणार आहे. मित्राला सोडवत नाही आणि प्रेयसीला दुखावता येत नाही अशा दोन भावनिक गुंतागुंतीत होत असलेली तारेवरची कसरत करताना 'फुगे' मध्ये स्वप्निल दिसणार आहे. 'फुगे' या सिनेमाची निर्मिती एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांनी केली आहे. इंदर राज कपूर या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत. स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित हा सिनेमा 2 डिसेंबला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.