Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नील जोशीचा नवीन सिनेमा नवीन वर्षात येणार रसिकांच्या भेटीला, समोर आले पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 06:30 IST

हे पोस्टर पाहिल्यानंतर या चित्रपटाची नक्की कथा काय असेल आणि यामध्ये नेमका स्वप्नील जोशी कोणत्या वेगळ्या लूक आणि भूमिकेमध्ये दिसणार आहे याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे.

स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेला एक वेगळा विषय मांडणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बळी’ असे या चित्रपटाचे नाव असून या सिनेमाचे नुकतेच पहिले पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘लपाछपी’ फेम विशाल फुरियाने केले आहे.

'बळी' या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये एक क्रॉस दिसत असून काहीतरी गंभीर घडते आहे, असे त्यातून प्रतीत होते. सिनेमा २०२० साली प्रदर्शित होणार असल्याचंही पोस्टर ध्वनित करते. हे पोस्टर पाहिल्यानंतर या चित्रपटाची नक्की कथा काय असेल आणि यामध्ये नेमका स्वप्नील जोशी कोणत्या वेगळ्या लूक आणि भूमिकेमध्ये दिसणार आहे याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे.

स्वप्नील जोशी म्हणाला, “यंदाच्या वर्षी प्रगल्भ मराठी प्रेक्षकांनी चित्रपटांच्या नवनवीन प्रकारांना पाठबळ दिले आणि आपलेसे केले. त्यातील माझे एक छोटे योगदान म्हणून या चित्रपटाच्या माध्यमातून मी हॉरर चित्रपटांच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. हा चित्रपट मला माझ्या आवडीच्या लोकांबरोबर करायची संधी मिळत असल्याचा अधिक आनंद मला आहे. कार्तिक आणि अर्जुन हे निर्माते आणि विशाल हे दिग्दर्शक, ही या क्षेत्रातील माझी आवडती माणसे आहेत. आमची ही टीम प्रेक्षकांना चांगलीच ‘घाबरवून’ सोडेल, याची मला पूर्ण खात्री आहे.”

या सिनेमाचे दिग्दर्शक विशाल फुरियानेयाआधी  ‘लपाछपी’चे दिग्दर्शन केले होते. तो त्याचा पहिला चित्रपट  होता“मराठी प्रेक्षकांना ‘लपाछपी’ खूप आवडला होता. प्रेक्षकांना हॉरर चित्रपटही आवडतात आणि ते त्यांना चांगला प्रतिसाद देतात हे या चित्रपटाने सिद्ध केले होते. म्हणून मला मराठी प्रेक्षकांसाठी हॉरर चित्रपट करायचे आहेत. स्वप्निलसारखा प्रेक्षकांच्या गळयातील ताईत असलेला अभिनेता आणि अर्जुन व कार्तिक सारखे या क्षेत्रातील दिग्गज निर्माते यांचे माझ्या चित्रपटाला पाठबळ आहे. या जोरावर मी ‘लपाछपी’पेक्षा अधिक मोठा आणि अधिक घाबरवणारा चित्रपट प्रेक्षकांना मिळेल, याची खात्री देतो,” असे उद्गार चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल फुरियाने काढले.

टॅग्स :स्वप्निल जोशी