Join us

स्वप्निल जोशी देतोय तरुणांना 'हा' सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 14:53 IST

सध्या टिकटॉक ॲपवर व्हिडियो तयार करण्याचा ट्रेंड आला असून तरुण पिढी याच्या चांगलीच आहारी गेली असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्दे टिकटॉक ॲप सांभाळून वापरण्याची विनंती केली आहेस्वप्निल जोशी मोगरा फुलला सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आहे

सध्या टिकटॉक ॲपवर व्हिडियो तयार करण्याचा ट्रेंड आला असून तरुण पिढी याच्या चांगलीच आहारी गेली असल्याचे दिसून येत आहे. मात्र या टिकटॉक ॲपमुळे काही बळी देखील गेले असल्याच्या घटना समोर येत असताना टिकटॉक जपून आणि केवळ मनोरंजनासाठी वापर करा असे आवाहन प्रसिद्ध मराठी अभिनेता स्वप्नील जोशी याने केले आहे.

तसेच टिकटॉक ॲप केवळ मजेसाठी असून त्याचा उपयोग मनोरंजनासाठी आणि आपल्यातली कला दाखविण्यासाठी करा असा संदेशही स्वप्नीलने दिला आहे.

तसेच टिकटॉक कंपनीने देखील आपल्या युजर्सना टिकटॉक ॲप सांभाळून वापरण्याची विनंती केली आहे. टिकटॉक ॲपमध्ये अनेक सुरक्षा उपाय आहेत तसेच आमच्या युजर्ससाठी नेहमीच सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण राहील. यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही आमच्या युजर्सना नेहमीच त्यांची सर्जनशीलता दाखवण्यासाठी तसेच कलागुण दाखवण्यासाठी प्रोत्साहित करतो. 

स्वप्निल जोशी मोगरा फुलला सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आहे. यात त्याने सुनिल कुलकर्णी नावाच्या तरुणाची भूमिका साकारली आहे.  स्वप्निल जोशीवर नेहमी आरोप होतो की तो लव्हबेल बॉयच्या इमेजमधून बाहेर पडत नाही .मात्र या सिनेमात स्वप्निल आपल्यावरील आरोपांना आपल्या भूमिकेतून चोख उत्तर दिलं आहे. साध्याभोळ्या सुनिल कुलकर्णीचं बेअरिंग स्वप्निलने पूर्ण सिनेमाभर अत्यंत उत्तम पकडलं आहे.

टॅग्स :स्वप्निल जोशी