Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्निल जोशीने सोशल मीडियावरून केले हे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 12:21 IST

स्वप्निल जोशी आज मराठीतील सुपरस्टार आहे. त्याचे फॅन फॉलॉव्हिंग हे प्रचंड आहे. त्याला भेटायला मिळावे अशी त्याच्या अनेक चाहत्यांची इच्छा असते. पण त्याला भेटवण्यासाठी काही लोक त्याच्या चाहत्यांकडे पैशांची मागणी करत असल्याचे स्वप्निलला नुकतेच कळले आहे.

आपल्या आवडत्या अभिनेत्या, अभिनेत्रीला एकदा तरी भेटायला मिळावे, त्याची एक तरी झलक पाहायला मिळावी. आपल्या आवडत्या अभिनेत्यासोबत फोटो काढून तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट करावा अशी अनेकांची इच्छा असते. त्यामुळे आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी त्यांचे फॅन्स काहीही करायला तयार असतात. काही वेळा तर तुमच्या आवडत्या कलाकाराला आम्ही भेटवून देतो. पण त्यासाठी आम्हाला इतके पैसे द्या असे सांगणारे देखील काही जण त्यांना भेटतात आणि फॅन्स देखील आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी पैसे द्यायला देखील तयार होतात. पण अनेकवेळा या सगळ्यात सामान्य फॅन्सना पैसे घेऊन फसवले जाते. 

स्वप्निल जोशी आज मराठीतील सुपरस्टार आहे. त्याने अनेक मराठी चित्रपट, मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये देखील त्याने काम केले आहे. त्याचे फॅन फॉलॉव्हिंग हे प्रचंड आहे. त्याला भेटायला मिळावे अशी त्याच्या अनेक चाहत्यांची इच्छा असते. पण त्याला भेटवण्यासाठी काही लोक त्याच्या चाहत्यांकडे पैशांची मागणी करत असल्याचे स्वप्निलला नुकतेच कळले आहे. स्वप्निल एका पुरस्कार सोहळ्यासाठी पुण्याला गेला होता. या पुरस्कार सोहळ्यावरून परतल्यानंतर दोन दिवसाने त्याला त्याच्या एका जवळच्या व्यक्तिकडून कळले की, त्याला भेटवण्यासाठी काही लोक सामान्य लोकांकडून पैशांची मागणी करत आहे. त्यावर स्वप्निलने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सने आवाहन केले आहे. त्याने ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर एक पोस्ट करून त्यात लिहिले आहे की, माझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या चाहत्यांसाठी एक कळकळीची विनंती आहे... स्वप्निल जोशीला भेटायचे असेल तर विशिष्ट रक्कम देऊन भेटू शकता/किंवा मी भेटवतो अशा जाहिरातींना/माणसांना बळी पडू नका. तुमच्यामुळेच मी आहे त्यामुळे मला भेटण्यासाठी माझ्या चाहत्यांना पैसे भरून भेटण्याची/कोणाच्या मार्फत येण्याची गरज नाही, कृपया याची नोंद घ्या. आपले प्रेम असेच कायम सोबत राहो... धन्यवाद...

स्वप्निल जोशीचा मुंबई पुणे मुंबई 3 हा चित्रपट लवकरच येत असून फॅन्स त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. 

टॅग्स :स्वप्निल जोशी