Join us

#BottleCapChallenge चा मराठी सेलिब्रेटींचा हा व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 16:05 IST

अमृता खानविलकर, स्वप्निल जोशी, सिद्धार्थ चांदेकर हे कलाकार देखील #BottleCapChallenge या चॅलेंजमध्ये भाग घेत असल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्देस्वप्निलने हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी समोर एक बाटली ठेवली आहे आणि तो आता ही बॉटल उडवणार असे वाटत असतानाच सिद्धार्थ चांदेकर ही बॉटल उचलतो. पण त्याची चूक लक्षात सिद्धार्थ ती बॉटल पुन्हा जागेवर ठेवून देतो.

हॉलिवूड स्टार जेसन स्टेथमने #BottleCapChallenge ची सुरुवात केली. त्यानंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी हे चॅलेंज स्वीकारताना दिसले. हे चॅलेंज पूर्ण करतानाचा अक्षय कुमारचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता मराठी चित्रपटसृष्टीत देखील #BottleCapChallenge चा ट्रेंड आला आहे असेच म्हणावे लागेल. कारण अमृता खानविलकर, स्वप्निल जोशी, सिद्धार्थ चांदेकर हे कलाकार देखील या चॅलेंजमध्ये भाग घेत असल्याचे दिसून येत आहे. 

स्टार प्रवाह या वाहिनीवरील जिवलगा ही मालिका सध्या प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडत आहेत. विशेष म्हणजे या मालिकेत मराठी चित्रपटसृष्टीतील आजचे आघाडीचे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. सिद्धार्थ, अमृता आणि स्वप्निलला मालिकेत पाहायला प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून त्यांनी आपल्या फॅन्ससाठी एक खास गोष्ट नुकतीच केली आहे. 

स्वप्निल, अमृता आणि सिद्धार्थ हे जिवलगा मधील कलाकार #BottleCapChallenge चॅलेंज घेताना दिसत आहेत. पण त्यांचे हे चॅलेंज घेण्याचा एक वेगळाच अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. या कलाकारांनी कशाप्रकारे चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला हे पाहून तुम्ही पोट धरून हसणार यात काहीच शंका नाही. सिद्धार्थ, स्वप्निल आणि अमृता यांनी हे चॅलेंज स्वीकारतानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओचीच सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

अमृता खानविलकरने इन्स्टाग्रामला शेअर केलेल्या तिच्या व्हिडिओत ती साडीच्या पदराने बॉटल कॅप उडवताना दिसत आहे तर स्वप्निल हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी गेला. पण त्याची फजिती झाली असल्याचे दिसून येत आहे. स्वप्निलने हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी समोर एक बाटली ठेवली आहे आणि तो आता ही बॉटल उडवणार असे वाटत असतानाच सिद्धार्थ चांदेकर ही बॉटल उचलतो. पण त्याची चूक लक्षात सिद्धार्थ ती बॉटल पुन्हा जागेवर ठेवून देतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही खळखळून हसणार यात काहीच शंका नाही. 

टॅग्स :स्वप्निल जोशीअमृता खानविलकरसिद्धार्थ चांदेकर