Join us

स्वानंद किरकिरे करणार 'चुंबक' मराठी चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 13:20 IST

आपल्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविणारे गायक स्वानंद किरकिरे हे प्रेक्षकांना लवकरच मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात ...

आपल्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविणारे गायक स्वानंद किरकिरे हे प्रेक्षकांना लवकरच मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात ते मुख्य भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटसृष्टीत गायक, गीतलेखन आणि संवादलेखक पाठोपाठ आता ते प्रेक्षकांना अभिनय करतानादेखील दिसणार आहे. चुंबक असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट संदीप मोदी यांनी दिग्दर्शित केला आहे. ते साहिल जाधव या नवोदित कलाकारासोबत झळकणार आहे. १४ वर्षाचा मुलगा आणि ४१ वर्षाच्या व्यक्तीच्या आयुष्यात असे काही बदल घडतात, जे अनुक्रमे ४१ आणि १४ वर्षांचे परस्पर आयुष्य जगू लागतात. अशा प्रकारची ही चित्रपटाची कथा असणार आहे. नाटय आणि विनोदी शैलीने या चित्रपटाची कथा मांडण्यात आली आहे. सौरभ भावे यांनी या चित्रपटाची कथा लिहीली आहे. तर या चित्रपटाच्या निर्मात्याची जबाबदारी नरेन कुमार यांनी पार पाडली आहे. त्यामुळे स्वानंद किरकिरे यांचा चुंबक या चित्रपटातील अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक असल्याचे दिसत आहे. स्वानंद यांनी यापूर्वी बर्फी, लागा चुनरी में डाग, थ्री इडियट्स, परिणीता अशा अनेक सुपरहीट बॉलिवुड चित्रपटातील गाण्यांना आपला सुरेख आवाज दिला आहे. तर पा, राजनिती, पीपली लाइव्ह, फेरारी की सवारी अशा अनेक बॉलिवुड चित्रपटांचे गीतलेखनदेखील केले आहे. त्याचबरोबर देऊळ, बालगंधर्व या मराठी चित्रपटांचे गीतलेखनदेखील केले आहे. त्यामुळे अशा या दिग्गज कलाकारांचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील आतुरतेने वाट पाहत आहे. तर त्यांच्या आगामी चुंबक या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप मोदी यांनी यापूर्वी राम ओमप्रकाश मेहरा, आशुतोष गोवारीकर आणि ओमप्रकाश मेहरा यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांसाठी खास असणार आहे.